नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेकायदेशीर वास्तव्य करणार-या बांगलादेशी महिलेस रायगड पोलिसांनी केले जेरबंद..


रायगड : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत मौजे नवेनगर, गणेश मंदीर जवळ, अश्विन पाटील यांची चाळ, पोयनाड येथे जावून दहशवाद विरोधी शाखा व बांगलादेशी विशेष पथक, रायगड यांनी छापा टाकला असता एक बांगलादेशी नागरिक महिला कोणतेही वैध प्रवासी कागपत्र, पासपोर्ट, व्हिसा, किंवा भारत सरकाने अथवा भारतीय सिमेवरील नोंदणी अधिका-याने नेमुण दिलेल्या मार्गा व्यतीरीक्त भारत बांगलादेश सिमेवरून चोरट्या मार्गाने घुसखोरी करून भारतीय सरहददीत प्रवेश करून मागील १५ वर्षापासुन भारतामध्ये बनावट आधारकार्ड बनवुन अनधिकृतपणे वास्तव्य करीत असताना मिळुन आली. तिला तिचे नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव शहानाबीबी जोहीद्दुल शेख, वय-३३ वर्षे सध्या रा. नवेनगर, गणेश मंदीरा जवळ अश्विन पाटील यांची चाळ, पोयनाड ता. अलिबाग जि. रायगड मुळ रा. कागमारी, पो. झिकरघासा, ता. सुटीपुर जि. जेशोर, बांगलादेश असे सांगितले. तिच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी करता तिच्याकडे भारतीय आधारकार्ड असल्याचे मिळून आले.


त्यामुळे सदर महिलेविरुद्ध पोयनाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०८/२०२३, परदेशी नागरीक अधिनियम, १९४६ चे कलम १४ A, पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३ अ, सह ६ अ, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४८ चे कलम ३, १, अ, भा. द. वि. सं. कलम ४६५, ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेस दिनांक २०/०८/२०२३ रोजी १८:१७ वा. च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि / सोमनाथ लांडे नेमणुक द. वि. शा रायगड हे करीत आहेत.

मा. पोलीस अधीक्षक, श्री. सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. अतुल झेंडे, पोलीस निरीशक, श्री. शिरीष पवार, अलिबाग पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / श्री. सोमनाथ लांडे, नेमणुक द. वि. शा. रायगड, सफौ/ गिरी, पोह/ २१३१ चिमटे, पोह/ २१३८ गोंजी, पोह/ १२१२ नागोठणेकर मपोह / ४१ यादव, मपोना/ ११८ सुतार व पोना / २३२९ मोरे यांनी वरील प्रमाणे छापा टाकून उल्लेखनीय कामगिरी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:36 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!