DPT NEWS NETWORK ✍️.
भडगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव द्वारा आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव च्या विद्यार्थिनींची संघ विजयी ठरला दि 28/11/2022 रोजी तालुका क्रीडा संकुल अमळनेर येथे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हाभरातील 16 तालुक्याचे संघ सहभागी झाले होते. यात 19 वर्षाआतील गटात अंतिम सामना बाल मोहन विद्यालय चोपडा संघ विरुद्ध आदर्श कन्या विद्यालय भडगाव संघचा सामना चुरशीचा ठरला आदर्श कन्या विद्यालयाने नाणेफेक जिंकून संरक्षण करण्याची भूमिका घेतल्यावर भडगावचा संघ 11 गुणांनी विजय ठरला संस्थेचे अध्यक्ष आण्णासो एकनाथ गरबड महाजन, मानद सचिव अण्णासो. दीपक संभाजी महाजन, उपाध्यक्ष भाऊसो. विजय लक्ष्मण महाजन, सन्माननीय संचालक मंडळ,प्राचार्य सुरेश रोकडे यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक ए.आर. देसले व रविंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.