DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीत आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवणारे तरुण नेतृत्व भाजपाचे शैलेंद्र आजगे यांची पुनःच्च एकदा धुळे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे. त्यांना भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी व धुळे ग्रा. भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते (दि. १ नोव्हें) रोजी पिंपळनेर येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. निवड झाल्याबद्दल राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
भारतीय जनता पार्टी धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा धुळे ग्रामिण जिल्हा सरचिटणीसपदी शैलेंद्र भगवान आजगे (साक्री) यांची निवड जाहिर केली आहे. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. संभाजीराव पगारे, नंदुरबार लोकसभा निवडणुक प्रमुख तुषार रंधे, भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, प्रदीप कोठावदे, विजय भोसले, जिल्हा सरचिटणीस सौ. लिलाबाई सुर्यवंशी, साक्री विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सुर्यवंशी, साक्री मंडळ अध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, धुळे जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, दिनेश नवरे, सौ. सुवर्णा आजगे, महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्षा प्रा. सौ. सविता पगारे, माजी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल पोतदार, डाॅ. राजेंद्र पगारे, प्रतिक कोतकर, राजेंद्र खैरनार, देवेंद्र पाटील, विलास मोरे, नितिन कोतकर, चंद्रशेखर बाविस्कर, रावजी चौरे, मनोज सोनवणे, दत्तु बोरसे, सुरेश पाटील, पंकज भावसार, संजय भिलाणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या धुळे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी दुसऱ्यांदा निवड झाल्याने वरिष्ठांनी शैलेंद्र आजगे यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आजगे यांच्याकडे कुशल नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व आहे. त्यांनी या बलस्थानांचा योग्य उपयोग करून साक्री शहर, तालुका व जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निवडीबाबत माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार डॉ हिनाताई गावित, आमदार अमरीशभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश प्रदेश मुख्यालय प्रभारी व उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवीजी आनासपुरे, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर, मालेगाव जिल्हा अध्यक्ष निलेशजी कचवे, प्राध्यापक डी. एस. गिरासे यांनीही सदिच्छा दिल्या आहेत.