DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपूर :- भिवापूर तालुक्यात तास गोंडबोरी, करगावं वासी, जवडी बोरगाव, झिलबोडी या गावामध्ये सर्रास दारुविक्री सुरु आहे आणि भिवापूर शहरातून दारू पुरवठा केला जातो. तास येथे औदयोगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूला खुलेआम कित्येक वर्षांपासून दारूचा अड्डा सुरु आहे. येणाऱ्याजणाऱ्या विद्यार्थाना त्रास सहन करावा लागतो या अवैध धंद्यानमुळे कितीतरी कुटुंब उधवस्त झाले. काही शाळकरी मुले व्यसनाधीन झाले तरी कित्येकवेळा तक्रारी करून पण हे अवैध धंदे अजून पर्यंत बंद झाले नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांवर थुतूरमुतुर् कारवाही करून सोडून देण्यात येते. गावकाऱ्यांची मागणी ही आहे की अवैध धंदे बंद न झाल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांना या सर्व अवैध धंद्यांबद्ल निवेदन देण्यात येईल. अशी चर्चा तालुक्यातील जनता करत आहे.