नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई, गांजा बाळगणे, गावठी दारू पासून देशी दारू तयार करणाऱ्याला अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- मनोहर गोरगल्ले


भोसरी :- पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, एक इसमाने पांच बंगला, एस. टी. रोड, दापोडी परिसरात गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला आहे. सदर ठिकाणी भोसरी पोलीसांनी पाच बंगला, एस.टी. रोड, दापोडी, पुणे येथील पी.डब्ल्यु. डी. च्या स्टिल यार्डयेथे जावुन खात्री केली त्यावेळी बातमीच्या वर्णनाचा एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो तेथील पडक्या रूममध्ये शिरला त्यावेळी पोलीसांनी त्याला चौहुबाजुनी घेरून लपुन बसलेल्या खोलीत जावुन आरोपी ओमकार महादेव लिंगे, वय २५ वर्षे, रा. पाच बंगला, घर नं.११, एस. टी. रोड, दापोडी, पुणे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची व खोलीची झडती घेतली असता ९ किलो ६२२ ग्रॅम वजानाचा गांजा, २३६० देशी दारू टँगो पंचच्या बाटल्या, ९०० मोकळ्या बाटल्या, लेबले व बाटल्याची झाकणे, १४० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली. पोलीसांनी सदर ठिकाणावरुन वरील प्रमाणे एकुण ३,५५, ५४१/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचेविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास दाखल गुन्ह्याचे तपास कामी अटक करून त्याचेकडे तपास केला असता तो गावठी हातभट्टीची दारू मोकळ्या बाटलीमध्ये भरून त्याला लेबल व सिल लावुन ती बनावट देशी दारू टँगो पंच नावाने विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह. आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ – १ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, संजय चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन गारडे, मच्छिंद्र बांबळे, राजेंद्र राठोड, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, संतोष महाडीक, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:37 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!