DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- पांडुरंग माने
सोलापूर :- मंगळवेढ्यातील राजकीय लोकांच्या तक्रारी व वाढलेल्या गुन्हेगारी अवैध व्यवसाय यांच्यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची नियंत्रण कक्षात केली असून, त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक नियोमी साटम यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले. मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आल्यामुळे अवैध व्यवसायिकाचे धाबे दनानले आहेत.
आयपीएस दर्जाच्या नियोमी साटम या प्रशिक्षणार्थी असून त्यांना 19 जून ते 1 सप्टेंबर पर्यंत मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी असून मुंबई येथे स्थायिक आहेत. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मंगळवेढ्यात कोरोना काळात बेशिस्त झालेल्या नागरिकांना शिस्त लावण्याबरोबरच तालुक्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यात पुढाकार घेतला होता.
चोरी प्रकरणातील जप्त केलेल्या मुद्द्यमाल फिर्यादीना परत केला हातभट्टी, जुगार अड्डे, गुटखा यावर सातत्याने कारवाया केल्या. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रंजीत माने यांचा जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी तपास कार्याबद्दल गौरव केला. तालुक्यात वडोळकरवाडी खून प्रकरण, बालक अपहरण, वाढत्या चोरीच्या घटना, अवैध व्यवसाय, खोटे गुन्हे आदी वरून पोलीस निरीक्षक माने यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यानी कोल्हापूर येथील पोलीस महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी दहा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यातआले.
एका बाजूला राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाबद्दल त्यांचा सत्कार केला. तर आंदोलन करत्या पदाधिकाऱ्यांचा तक्रारी मागील हेतूवर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी प्रत्युत्तर दिले. सध्या मंगळवेढ्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दिवसा होणाऱ्या घर फोड्या त्या गुन्ह्याची उकल यासह अवैध वाळू वाहतूक कर्नाटक मार्गे होणारी गुटखा वाहतूक इतर अवैध धंदे आधी प्रश्नावर पोलिसांच्या कारवाईनंतर देखील अवैध व्यवसाय सुरूच राहतात त्यावर कायमस्वरूपी निर्बंध घालण्याच्या दृष्टीने नव्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे. कर्नाटकातून येणाऱ्या राज्यभर अवैध व्यवसायिकासाठी मंगळवेढा हे प्रवेशद्वार असल्यामुळे यापूर्वी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे माने यांच्या बदलीचे आदेश झाल्याचे समजताच मंगळवेढा राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
उच्च न्यायालयाने नागरिका वरील दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यावर चौकशी करून कारवाई का झाली नाही. याबाबत पोलीस प्रमुखांना खुलासा मागितल्यानंतर सर्व पक्षियानी वाढवलेले अवैध व्यवसाय सामान्य जनतेशी अधिकाऱ्याची बोलण्याची पद्धत या गोष्टी पोलीस महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस निरीक्षक माने यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.
सामान्य माणसात पोलिसाविषयी प्रतिमा उंचावण्याबरोबर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यावर भर राहील एस पी दर्जाचे अधिकार असल्यामुळे मी कुणाच्या आदेशाची वाट बघणार नाही. सध्या वारीचा बंदोबस्त असल्याने वारी नंतर आपल्या कामाचा अनुभव लोकांना येईल असे आयपीएस अधिकारी नियोमी साटम (पोलीस निरीक्षक मंगळवेढा) यांनी सांगितले.