DPT NEWS NETWORK 🗞️✍️
लाख खंडाळा :- दिनांक 26. 10. 2023 रोजी सकाळीच लाख खंडाळा येथे मराठा आरक्षणाच्या लढाईची धग आता ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. विविध पक्षाच्या पुढाऱ्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील समाज बांधवांनी एकमताने निर्णय घेत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत जबाबदार लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते ठराव त्वरित करून निर्णय घेण्यात आला तसेच गावातील सर्व जाती धर्मीय समाज बांधवांच्या उपस्थितीत निर्धार करून निवेदन देण्यात आले. याबाबत आव्हान करण्यासाठी गावच्या प्रमुख प्रवेश रस्त्यावर माहिती फलक लावण्यात आली आहे. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष मान मर्यादा रोखून नेत्यांनी प्रवेश करावा अशा सूचना करत गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली.