नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराष्ट्राच्या डीजीपीपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक होण्याचा मिळविला मान

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
मुंबई – महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.

रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे. सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधीच त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. फोन टॅप प्रकरणी शुक्लांवर आरोप करण्यात आला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी शुक्ला यांच्याविरोधात मविआ सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी कोर्टात भूमिका मांडली होती. राजकीय हेतून प्रेरित होवून आपलं नाव या प्रकरणात गोवण्यात आल्याचे रश्मी शुक्ला यांनी कोर्टात सांगितले होते.
रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप करुन त्यांच्या संभाषणाची माहिती देवेंद्र फडणीस यांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पुण्यात पोलिस आयुक्त असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात रश्मी शुक्ला यांनी भूमिका मांडल्यानंतर कोर्टाने हे दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आले आहे.

सर्व कयासांना पूर्णविराम
रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या नवीन महासंचालक पदाची धुरा कोणाकडे जाईल, याविषयी चर्चांना उधाण आले होते. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत (महासंचालक इंडो-तिबेट सीमा पोलिस) असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते, असा कयास लावला जात होता. रजनीश सेठ १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी असल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात होते. जून २०२४ मध्ये त्याही निवृत्त होणार आहेत. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आता रश्मी शुक्ला यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने सर्व कायासांना पूर्णविराम मिळाला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:33 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!