DPT NEWS NETWORK 🗞️✍️
मुंबई :- महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांच्या, पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश गृहविभागाने बुधवारी (दि.31) काढले आहेत. पुण्यातील अपर पोलीस आयुक्त, गुन्हे आर. एल. पोकळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
१)निसार तांबोळी (विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
२)ए.डी. कुंभारे (विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)
३)आर.एल. पोकळे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर ते विशे, पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती (पदोन्नतीने)
४)चंद्रकिशोर मीना (अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (पदोन्नतीने)
५)आरती सिंह (अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई (पदोन्नतीने)
बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
१)निमित गोयल (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. 14, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)
२)राजेंद्र कुमार दाभाडे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे)
३)वैभव कलुबर्मे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, जि. अहमदनगर)
४)कविता नेरकर (पोलीस अधीक्षक, सायबर, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जि. जळगाव)
५)संजय जाधव (अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण व गृह रक्षक दल, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण)
६)स्वाती रामराव भोर (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, जि. अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर)
७)रमेश चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जि. जळगाव ते अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
८)पराग मनेरे (पोलीस उपायुक्त, विशेष सुरक्षा (V.I.P. Security) राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
९)संदीप जाधव (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते पोलीस उपायुक्त,बृहन्मुंबई)
१०)हिम्मत हिंदुराव जाधव (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई (रुजू नाहीत) ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर)
११)अपर्णा सुधाकर गिते (पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)
१२)दत्तात्रय बापु कांबळे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
१३)विशाल गायकवाड (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड)
१४)काकासाहेब आदिनाथ डोळे (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)