DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
महाळुंगे: महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे इंगळे गावातील अपहरण झालेल्या आदित्य भांगरे नामक तरुणाला बेदम मारहाण करून त्यात त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह महाराष्ट्र -गुजरात सीमेवर असणाऱ्या जंगलात जाळल्याची धक्कादायक माहिती चाकण पोलिसांना अटक केलेल्या आरोपीकडून मिळाली आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, अटक करण्यात आलेला आरोपी अमर नामदेव शिंदे वय वर्षे २५ वर्षे, रा. कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे यांच्याकडे चाकण पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा सहकारी आरोपी राहुल पवार याच्या भावाचा खून झाला होता त्याचा चेहरा छिन्न विच्छिन्न अवस्थेतेतील फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केल्याचा मनात राग धरून आदित्य भांगरे वय वर्षे १८ नामक तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण याचा निर्घृन पणे खून करण्यात आल्याची कबुली अटक आरोपीने दिली.
या गंभीर घटनेची कामगिरी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, नामदेव तलावडे, सुरेश हिंगे, संदीप सोनवणे, निखिल शेटे, नितीन गुंजाळ, माधुरी कचाटे यांच्यासह या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत.