DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ पुणे जिल्हा प्रतिंनिधी – मनोहर गोरगल्ले
चाकण : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या वासुली फाटा येथील रुद्रा हॉटेलच्या समोर भामचंद्ररोडला एका व्यक्तीकडे तब्बल १० किलो १०४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आल्याची समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, ६ जून २०२३ रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वासुली फाटा येथील भामचंद्र रोडवर एक व्यक्ती रवींद्र काशीराम राठोड(वय-३८ वर्षे) रा. मोरे कॉम्प्लेक्स कडूस, त.खेड, जि. पुणे याला ताब्यात घेऊन या व्यक्तीकडून एकूण २,८२,६०० रुपये किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला. त्यात २ लाख ५२ हजार ६०० रुपये किमतीचा १० किलो १०४ ग्रॅम वजनाचा गांजा त्याच बरोबर ३० हजार रुपयांची बजाज कंपनीची दुचाकी गाडी मिळून आली. आरोपी रवींद्र काशीराम राठोड हा गांजा अवैध पद्धतीने विक्री करत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी रवींद्र राठोड हा गांजा विकास बधाले रा. नवलाखउंब्रे, ता. मावळ, जि. पुणे यांच्याकडून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस शरद शांताराम खैरे(वय-३८ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोनही आरोपींवर एन. डी.पी. एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(त्त)(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी हे करत आहेत.