नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मालेगाव शहरातील युवकाचे खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहरातून केले जेरबंद

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे

मालेगाव:- 15 एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात  युवक नामे रफिक खान अन्वर खान (रा. संगमेश्वर, मालेगाव) हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा असतांना, त्याचा मित्र नामे रफिक शहा अमिन शहा उफ लम्बा रफिक व त्याचेसोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळुन, मागील भांडणाची कुरापत काढून युवक रफिक खान यास शिवीगाळ करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून जिवे ठार मारले. याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुरनं ११७/२०२४ भादवि कलम २३०२, ५४०४, ५३०६, २३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपीतांनी पलायन केले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, सहा.पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी यातील आरोपीतांना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन, यातील मुख्य आरोपी रफिक शहा उफ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्यातील मुख्य आरोपी रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक (वय २८, रा. संगमेश्वर, मालेगाव) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार फैसल पुर्ण नाव माहित नाही याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस ठाणेस वरील गुन्ह्यात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फेसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे. यातील आरोपी रफिक शहा उफ लम्बा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते, त्यास स्थागुशाचे पथकाने दोन तासांचे आत ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल देखील हस्तगत केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, सहा.पोलीस अधीक्षक  तेघबीरसिंग संधु, सहा.पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि संदिप पाटील, हवालदार चेतन संवत्सरकर,  शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने सदर खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:08 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!