DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अकोला:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा राजुरा घाटे या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 5 सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिन जिल्हा परिषद कर्मचारी भवन अकोला येथे पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला होता, त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिक्षण सभापती मायाताई नाईक ,मुख्याधिकारी बी वैष्णवी मॅडम, शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार आणि फडके मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद शाळा राजुरा घाटे उपक्रमशील शाळा म्हणून मुर्तीजापुर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील शाळेची पाच वर्षांमध्ये पटसंख्येत वाढ झाली आहे, वर्ग एक ते आठवी पर्यंत वर्ग आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना येवले आणि शिक्षक वृंद श्री लेखणार, श्री दुतोंडे, श्री कुलकर्णी, श्री गाडेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बर्डे, उपाध्यक्ष दत्ता घाटे, माजी अध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ प्रदीप घाटे, विनोद हांडे यांच्या सर्व सदस्य सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. मागील दोन वर्षात शाळेचे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारून यशस्वी झाले आहेत, तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
गावचे सरपंच श्री बंडू दादा घाटे यांनी शाळेला बहुमूल्य सहकार्य केले आहे, तसेच शाळेला यश मिळून दिले आहे. या बरोबरच विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री गोपाल दादा घाटे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. याप्रसंगी गावाच्या वतीने कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका कल्पना येवले तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला, गुणवत्तापूर्वक आणि आनंददायी असे शिक्षणाला पूरक वातावरण शाळेमध्ये निर्माण केले आहे.
त्याचे फलित म्हणून माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत क्रमांक मिळविता आला.