स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची मोठी कार्यवाही
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी — साईनाथ खंडेराय
नांदेड:- दिनांक 27/08/2024 रोजी स्थागुशा, नांदेड येथील पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काही इसम मुदखेड येथे काही जनावरांना कत्तलखान्यात डांबुन ठेवले आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सोबत अमंलदार यांना घेवुन प्रॉपर मुदखेड शहरात कुरेशी मोहला परीसरात जावुन सापळा रचुन, टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड येथील 1) महम्मद निसार महम्मद मदार रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 2) महम्मद सदाम महम्मद महेबुब रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 3) महम्मद फेरोज महम्मद इस्माईल रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड याचे टिन पत्र्याचे शेड मध्ये छापा मारला असता, नमुद ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे एकुण 59 गायी, वासरे व 01 बैल किंमती 6,10,000/- रुपयाचे मिळुन आले. नमुद ठिकाणी मिळुन आलेल्या वरील नमुद तिन्ही आरोपीतांना मिळुन आलेल्या गोवंश जनावराचे संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी मिळुन आलेले जनावरे कत्तलीसाठी आणले असल्याचे सांगीतलेने नमुद तिन आरोपी व त्यांना मदत करणारे, विक्री करणारे, इसमांविरुध्द पोलीस ठाणे मुदखेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन मिळुन आलेल्या जनावरांना गोशाळा येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलिंद सोनकांबळे, पोलीस अमंलदार माधव केंद्रे, बालाजी यादगीरवाड, शिवा ढवळे, विजय तोडसाम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.