नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मेडिकल ॲडमिशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचा गंडा; भाजप कार्यकर्त्याला अटक; एका विद्यार्थ्याकडून 11 लाख घेतेल

DPT News Network वसई: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया येथे ओळख आहे आणि त्यांच्या मार्फत नालासोपारा येथील नरसिंग दुबे चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल फिल्डला प्रवेश मिळवून देतो असे सांगून बारावीच्या विद्यार्थ्याची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला वसईतून अटक करण्यात आली आहे. सुधांशू जगदंबा चौबे (वय 32 )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा वसईचा राहणारा असून तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधांशू चौबेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आणखी काही फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊन देतो असं सांगून त्याने अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे समजले असून 62 लाखापेक्षाही अधिक रक्कम त्याने अनेक जणांकडून घेतले असल्याचे पोलिसांनी सांगतले. मेडिकल कॉलेजच्या नावाखाली डुप्लिकेट इमेल आयडी बनवून मेडिकल कॉलेजसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना संपर्क साधून मी तुम्हाला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो म्हणून संपर्क साधता होता.

11लाख देऊनही प्रवेश नाही
मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो असं सांगून जय विजय पाटील या 20 वर्षाच्या मुलाला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्याकडून त्याने 11 लाख रुपये घेतले होते. त्याच्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतरही आणि विद्यार्थ्याने चौकशी करुनही प्रवेश मिळाला नसल्याने त्यानंतर विद्यार्थ्याने पोलिसांशी संपर्क साधला.

माणिकपूर पोलिसात तक्रार
पैसे दिले पण प्रवेश होत नसल्यामुळेमुळे आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर जय पाटील यांनी प्रथम माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फसवणूक करणाऱ्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत 62 लाखापेक्षाही अधिक रक्कम उखळली
या आरोपीने आतापर्यंत 62 लाख 12 हजार 820 रुपयांची विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली असेल तर तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे अहवानही वसई विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:07 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!