DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
खेड पोलिस स्टेशनचे अनमोल सहकार्य माऊली सेवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना आले यश ..
राजगुरुनगर – येथे ४ मार्च २०२३ पासुन एक वैफल्यग्रस्त महिला महात्मा गांधी विद्यालया जवळ वाडारोडला आढळुन आली असता माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास दुधाळे यांनी तिची चौकशी केली. त्या महिलेने तिचे नाव मंगल शेषराव मानकर सांगितले आणि गाव वाडेगाव ता.बाळापुर जि.अकोला असे सांगितले. वाडेगाव या ठिकाणी सोशल मिडियामार्फत चौकशी केली तिथे त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत असे समजले.
सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी त्या महिलेस रात्री झोपण्यासाठी अंथरूण आणि तिला जेवण दिले व आज सकाळी त्या महिलेस चहा व नाश्ता देण्यासाठी गेले असता त्या वैफल्यग्रस्त महिलेने आक्राळविक्राळ रुप धारण केले होते. रस्त्याच्या मध्यमागी झोपने /लोळने अंगावरील कपडे काढने, लोकांना दगडी मारने, असे प्रकार पाहुन नागरीक भयभीत झाले होते. अशावेळी तात्काळ दुधाळे यांनी खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांना मोबाईलवरुन महिलेविषयी माहिती दिली.
पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे साहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच पोलिसव्हॅन आणि सहा पोलीस घेऊन आले व त्या वैफल्यग्रस्त महिलेस गाडीत बसवुन पोलिस स्टेशनला नेले.
त्या महिलेला पुढील आधार व उपचार कुठे मिळतील याचा शोध पोलिस घेत असताना त्यांना कैलास दुधाळे यांचे आळेफाटा येथील मित्र सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार यांच्याकडुन नगर येथील दिलिप गुंजाळ यांच्या मानवसेवा प्रकल्पाची माहिती मिळाली.
पोलिसांनी समाजसेवक दिलीप गुंजाळ यांना सविस्तर माहिती सांगितल्यावर दिलिप गुंजाळ यांनी त्या व्यक्तीस मानवसेवा प्रकल्पामध्ये दाखल करण्यास परवानगी दिली.
खेड पोलिस स्टेशन आणि माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या महिलेस तिथे सोडविण्यात आले. त्यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक कैलास दुधाळे., पोलिस अधिकारी सागर शिंगाडे , महिला होमगार्ड आफरिन इनामदार उपस्थित होते.
खेड पोलिस स्टेशन व माऊली सेवा प्रतिष्ठान यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे त्या महिले संदर्भात मोठा अनर्थ टळला असे नागरिकांने मत व्यक्त केले ..
याकामी अरणगावचे उपसरपंच महेश पवार खेड पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, ठाणे अंमलदार अमोल चासकर आणि बिडकर पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, सामाजिक कार्यकर्ते निलेश घुमटकर, निलेश कहाने ,संदीप दिवटे, मनोहर गोरगल्ले, नितीन सैद, अनिल भुजबळ, ओंकार दुधाळे यादींचे सहकार्य लाभले.