राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 104 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे दिले आदेश.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
मुंबई – राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 104 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश दिले आहे. गृह विभागाने 13 ऑक्टोबरला जारी केलेल्या आदेशात 104 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.
या आदेशामुळे 34 अधिकारी मुंबई पोलिस दलात पदोन्नतीनंतर कार्यरत होणार आहे. बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.
बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.