(Dpt news Network- हरिश्चंद्र महाडिक )
सुतारवाडी:- रायगड जिल्हा परिषद शाळा कामथ ता. रोहा , जि. रायगडयेथे ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . मा.श्री. सोनाराम सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेशमा प्रशांत वाघचौरे सहशिक्षिका श्रीमती अंजली अरविंद गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी संदेशपर भाषणे केली. १) देशभक्तीपर गीत – दिपीका दिलीप पवार इ.३री २) शेतकरी गीत – सोनाली यशवंत जाधव इ.४थी३) गणतंत्र दिन- विजय मारुती मोरे इ.२ री४) एकपात्री नाटक- निधी संजय सुतार इ. 2 री५) पर्यावरण गीत- अजय मारुती मोरे इ.४ थी६) इंग्रजी भाषण – राज संजय निळेकर इ. 2 रीतसेच सोनाक्षी शिर्के, शितल सानप, ओम सानप, यश शिर्के आदींनी भाषणे केली . मुख्याध्यापक सौ. रेशमा वाघचौरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर सुत्रसंचालन श्रीम. अंजली गुंजोटे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवास अनुसरून काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती. यावेळी उपस्थित मान्यवर सौ. मेघा निळेकर सौ. संगिता शिर्के सौ. विद्या निळेकर , जयश्री सानप श्री.राजाराम कोंडे श्री . महेश निळेकर श्री.चंद्रकांत निळेकर, श्री.मेने , श्री.आनंद सानप श्री.अरविंद निळेकर जयश्री जाधव, दर्शना महाडिक सुमती निळेकर तसेच सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. शा. व्य. स.अध्यक्ष सौ. सेजल सुतार यांनी मुलांना बक्षीस म्हणून पेन वाटप केले, खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.