DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – रयप्पा मंडले
कासार शिरशी: लातूर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा. डॉ. दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासार शिरशी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाळे यांच्या नेतृत्वाखाली कोराळ वाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 2 इसमावर पोलीस ठाणे कासार शिरशी पथकाने. दिनांक 4/12/2022 / रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारी केली.
यामध्ये 915 लीटर रसायन साहित्य हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 46 हजार रुपयाचे रसायन हातभट्टीची दारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कारवाईत आरोपी उमाकांत दगडू रोहिदास यंपाळे वय 35 वर्ष राहणार कोराईवाडी तालुका निलंगा आरोपी अजय अंबादास रेवणे वय 20 वर्षे राहणार कोराळेवाडी अशा एकूण 2 आरोपीवर पोलीस ठाणे कासार शिरशी येथे कलम( 65) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 2 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासार शिरशी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाळे पोलीस उपाधीक्षक गजानन श्रीसागर पोलीस अमलदार श्रीकांत वरवटे मनोज चव्हाण अमोल नागमोडे यांनी केली आहे.