नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लिफ्ट मागणं जीवावर बेतलं, २३ वर्षीय तरुणाच आयुष्य संपल, फोन पे मुळे आरोपी सापडले

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ धाराशिव: दारुचे व्यसन एखाद्याला कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गड देवधर पाटी येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती. तिघा आरोपींनी दारुच्या व्यसनापायी २३ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर मयत तरुणाला नग्न अवस्थेत गवतात टाकून त्यांनी पोबारा केला होता. याच गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात धाराशिव पोलिसांना जवळपास दीड वर्षांनी यश आलं आहे.

पाहुण्याचे लग्न कार्य असल्यामुळे घरी लवकर जावं, म्हणून धाराशिव येथील स्टेनो शिकणारा कृष्णा शिवशंकर कोरे (वय २३) हा तरुण दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ढोकी येथे रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वाहनाची वाट पाहत थांबला होता. यावेळी केजकडून धाराशिवकडे जाणारा बोलेरो पिकअप MH 44- 8684 जात होता. धाराशिवसाठी लिफ्ट मागताच पिकअप मधील रमेश भगवान मुंढे (रा. कोयाळ ता. धारुर जि. बीड), शिवशंकर हरिभाऊ इंगळे (रा. केज ता. केज जि. बीड), अमोल अशोक मुंढे (रा. कोयाळ ता. धारुर जि. बीड) यांनी कृष्णाला जागा दिली. वाटेत तिघांना दारुची तलफ आली. त्यामुळे वाटेतच कृष्णाला मारहाण करुन त्यांनी कृष्णा जवळील रोख रक्कम काढून घेतली.

शिंगोली जवळील गड देवधर येथील कमानी जवळील गवतात कृष्णाला टॉमीने मारहाण केली. मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड घेतला. कृष्णाला तिथेच टाकून मोबाईलसह तिघे धाराशिव शहरातील मेघदूत बारवर आले. तिथे दारु खरेदी केली. नंतर शहरातील बस स्टँन्ड समोरील रिक्षावाल्याकडून ३५०० रुपये रोख घेतले. नंतर गड देवधर पाटी जवळ येऊन कृष्णाला जबरदस्तीने दारु पाजली. दारुच्या नशेत कृष्णाला लाथा बुक्क्यानी, टाँमीने मारहाण केली, यात कृष्णाचा मृत्यू झाला. कृष्णाला तेथेच टाकून तिघांनी पोबारा केला.

सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली. नंतर आनंदनगर पोलीस स्टेशनला ३०-०३-२०२२ रोजी भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी सुरुवातीला पोलीसाकडे गुन्ह्याची उकल करण्यासाठी काहीच नव्हते. पण आरोपीने कृष्णाचे फोन पे वापरले होते. फोन पे ट्रांझॅक्शन तपासले असता, शहरातील मेघदूत बारचा सुगावा लागला. तेथील CCTV फुटेज असल्यामुळे आरोपीची ओळख निष्पन्न झाली.

शिंगोली जवळील गड देवधर येथील कमानी जवळील गवतात कृष्णाला टॉमीने मारहाण केली. मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड घेतला. कृष्णाला तिथेच टाकून मोबाईलसह तिघे धाराशिव शहरातील मेघदूत बारवर आले.

धाराशिव पोलिसांनी १ महिन्यानंतर रमेश भगवान मुंढे, शिवशंकर हरिभाऊ इंगळे यांना अटक केली. यातील रमेश मुंढे हा जेलमध्ये असून शिवशंकर इंगळे याला जामीन मिळाला आहे. यातील मुख्य आरोपी अमोल अशोक मुंढे हा गेली दीड वर्षे पोलीसांना गुंगारा देत होता. अमोल मुंढे विरुद्ध बीड, धाराशिव, परभणी, पुणे येथे खून, जबरी चोरी, खंडणी, दुखापत करणे, असे गुन्हे दाखल आहेत. गुप्त माहितीच्या आधारे धाराशिव पोलिसांनी अमोल मुंढेला कोयाळ येथून अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
3:39 am, December 23, 2024
20°
छितरे हुए बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!