DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नंदू मेश्राम
चंद्रपूर :- गळा कापून वयोवृद्ध माणसाचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर शहरातील टिळक मैदान परिसरात सकाळच्या वेळेस उघडकीस आली, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, मृतकाचे नाव मधूकर मंधेवार (70) असे असून तो शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटना स्थळी दाखल झालेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी ही घटनास्थळी पोहचत घटनेची माहिती घेतली, या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.