आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर – आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे असे म्हणतात आणि देशात अनेक जाती धर्मांचे लोक वास्तव्यास आहेत आणि आप-आपल्या धर्मसंस्कृतीनुसार विविध धर्म ग्रथांचे पठन करत असतात अशातच बौद्ध धर्माच्या संस्कृती प्रमाणे ” वर्षावास ” सुरु झाला असून शहरासह तालुक्यातल्या असंख्य गावात धम्म ग्रंथ पठनाला सुरुवात झाली आहे.
बौद्ध धर्माच्या संस्कृती प्रमाणे ‘गुरुपौर्णिमा’ पासून ‘वर्षावास’ सुरू झाला असून, मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील अनेक बुद्ध विहारात धम्म ग्रंथ पठनाला सुरुवात झाली आहे. तीन महिने चालणाऱ्या वर्षावासात विविध धार्मिक कार्यक्रमाचीही रेलसेल राहणार आहे. तथागत गौतम बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक जो धम्म सांगितला, तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा, प्रारंभी कल्याणपद, मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा, असा आदेश संघाला दिला. बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत. या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत असत. त्याकाळी खूप पाऊस पडत असे, पावसामुळे पायी फिरणे भिक्खू संघाला अशक्य होते. पावसाच्या काळात भिक्खूनां भिक्षासाठी जाता येत नसल्याने त्यांची उपासमारही होत असे.एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात आणि अनेक भिक्खूंना यामध्ये जीव गमवावा लागत असे. अनेक आजारांचा संघाला सामना करावा लागत होता. हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या. ‘आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा’ हा तीन महिन्याचा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून सुरू झाला.अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या. ‘आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा’ हा तीन महिन्याचा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून सुरू झाला.वर्षावास काळात उपासक-उपासिका विहारात जावून धम्म श्रवण करून विहारात भिख्खूंना भोजनदान देत. बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. उपासक- उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वःताच्या घरी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथांचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे सामूहिक वाचन करून त्यावर चिंतन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे.
——————————————————————————
भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून वर्षावास कालावधीत भगवान गौतम बुद्ध यांनी केलेला धम्माबाबतचा उपदेश हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यामध्ये १९-२२ विषयांचे सादरीकरण करण्याकरिता जिल्ह्यासह तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा सुरुवात झाली आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन त्या विषयांचे सादरीकरण करून धम्माचा प्रचार व प्रसार करणे हा या वर्षावातील उद्देश आहे.
दुर्योधन ननीर, जिल्हा उपाध्यक्ष,
भारतीय बौद्ध महासभा ( संस्कार विभाग )
——————————————————————————
( चौखट )
वर्षावास काळात उपासक-उपासिका विहारात जावून धम्म श्रवण करून विहारात भिख्खूंना भोजनदान देत. बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. उपासक- उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वःताच्या घरी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथांचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे सामूहिक वाचन करून त्यावर चिंतन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे.
—————-बौद्ध धम्माचा—————- प्रचार-प्रसार करण्यासाठी भिक्खू संघाच्या सुरक्षितेसाठी बुद्धांनी तीन महिने वर्षावास करण्यासाठी संघाला आदेश दिला. धम्म ग्रंथाचे श्रवण करण्यासाठी, कल्याणकारी शिक्षणाकरिता, जीवनात परिपूर्णता साधण्यासाठी व सदाचारी जीवन जगण्याकरिता प्रत्येकांनी वर्षावासात बुद्ध विहारात गेले पाहिजे.
भन्ते शिलानंद,
धम्मकुटी, मंगरूळ कांबे