नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विजयादशमीच्या निमित्याने, रावणदहन….

*रावणदहन.........वाईट प्रवृत्तीचा नाश म्हणून दरवर्षी रावणदहन केलंं जातं आणि विजयादशमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतू आपण विचार करीत नाही की खरंच आपण रावणदहन करणारी माणसं ख-या प्रमाणात सात्वीक आहोत का? खरंच आपल्याला रावण दहनाचा अधिकार आहे का? जर आपण सात्वीक असेल असे आपल्या स्वतःला वाटत असेल, तर आपण रावणदहण अवश्य करावं. अन्यथा आपल्याला रावणदहनाचा अधिकार आहे का? यावर विचार करुन मगच रावणदहन करावं म्हणजे झालं.* आज चांगला व्यक्ती वा इमानदार व्यक्ती समाजाला चालत नाही. कारण समाजात आज वाईट व वाह्यात माणसं वावरत असलेले दिसून येत आहेत. सर्वत्र भ्रष्टाचार पसरलेला असून जे काही दोनचार लोकं आहेत. त्यांच्याच कर्तृत्वावर देशाच्या कारभाराची उलाढाल सुरु आहे. म्हणूनच देश आज उभा आहे. काही प्रमाणात विकासही करीत आहे. वरील बाबींचा विचार करता असा विचार साहजीक मनात येईल की पुर्वी नव्हते काय समाजात वाईट प्रवृत्तीची लोकं? होती, परंतू त्याचे प्रमाण हे अत्यल्प होते. समाजात दोन प्रवृत्तीचे लोकं असतात. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात. चीत आणि पट. तशाच प्रवृत्तीलाही दोन बाजू असतात. त्यानुसार वाईट प्रवृत्तीची माणसं वाईट वागत असतांनाही त्यांना त्यांच्या वागण्यात वाईट दिसत नाही. त्यांना ते बरोबरच दिसतं. कारण त्यांचे विचार वाईट असतात. त्याचमुळे त्यांना समाजातील चांगली माणसंही आवडत नाहीत. त्यांना वाईटच माणसं आवडतात. मग कोणी त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगीतल्या, तरी त्या गोष्टी वाईटच वाटत असतात. ते चांगल्या गोष्टीचा विचारच करीत नाही. त्यामुळं त्यांना पटवून देण्यासाठी वारंवार चांगल्या गोष्टींची शिबीरं भरवली जातात. वक्तृत्वस्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेतल्या जातात. संस्कार, शिबारं आयोजीत केली जातात. त्यातच कवीसंमेलन आणि साहित्यसंमेलनंही. परंतू त्याही विचारपीठावरुन लोकं फक्त एका कानानं त्या चांगल्या गोष्टी ऐकतात आणि दुस-या कानानं त्या गोष्टी सोडून देतात. त्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करीत नाहीत वा त्या चांगल्या गोष्टी आत्मसात करीत नाहीत. आज विजयादशमी आहे. हा सण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्यानं लोक रावण दहन करतात. याचा अर्थ रावण काय चांगला व्यक्ती नव्हता काय? तो चांगलाच व्यक्ती होता, तो प्रकांड पंडीत होता. त्याला वेदांचं पुरेपूर ज्ञान होतं. त्यातच त्यानं शेवटच्या समयी लक्ष्मणाला केलेला उपदेश वाखाणण्याजोगा होता. तसेच तो शूरवीरही होता. त्यानं सिंहासनात आपल्या विचार व ताकतीच्या भरवशावर नव ग्रहांनाही बांधून ठेवलं होतं. तरीही भारतात त्याचं दहन केलं जातं. कारण तो जरी चांगला असला तरी त्यांच्या अंगात असलेली जी दृष्ट प्रवृत्ती होती. खरं तर त्या दृष्ट प्रवृत्तीचं दहन केलं जातं, रावणाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून. तो जाळला जातो, एक प्रकारचा संदेश देण्यासाठी. संदेश असा की वाईट प्रवृत्ती सोडा, नाहीतर मरणानंतर तुमचीही अशीच अवस्था होईल. परंतू लोकं काही ऐकायला तयार नाहीत. ते फक्त रावणाच्या प्रतिकात्मक रुपाला जाळतात. त्यापासून बोध घेत नाहीत. पर्यायानं रावणाबद्दल एक बाजू सांगायची झाल्यास तो चांगला होता. तसंच दुसरी बाजू सांगीतली जाते की तो वाईट होता. ह्या दोन्ही गोष्टी विसंगत वाटतात. कारण जो चांगला असतो. तो वाईट नसतो आणि जो वाईट असतो. तो चांगला नसतोच. मग रावण जर वाईट होता तर तो चांगला कसा आणि तो जर चांगला होता तर वाईट कसा? महत्वाचं म्हणजे रावण वाईट नव्हता. त्यानं आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं सीतेला पळवलं. हा त्याचा वाईटपणा आहे काय? नाही. तो वाईटपणा नाही. परंतू त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या पूर्ण परीवाराला दावणीला लावले नव्हेतर आपल्या पूर्ण परीवाराचा अंत करुन घेतला. त्यांचा दोष नसतांना. ही वाईट गोष्ट आणि परीवारातील काही सदस्य त्यांच्या इगोपणामुळं रावणाच्या झाशात येवून लढून मरण पावले. त्या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार रावणच होता. म्हणून तो वाईट होता. त्यानं त्याच्या मुलीसमान असलेल्या सीतेला पळवलं, आपल्या बहिणीच्या प्रकरणाची शहानिशा न करता, म्हणून तो वाईट होता. तसेच रावण वाईट होता. कारण त्यानं बालीच्या राजमहालातील सुरक्षीत असलेला दशरथाचा राजमुकूट पळवला. रावणाच्या वाईट वागण्याच्या अनेक गोष्टी दिसून येतात. त्यानं आपला भाऊ विभीषणाला लाथ मारुन बाहेर काढले. त्यात महत्वाचं म्हणजे मी म्हणतो तसं वाग. यातून हुकूमशाही तत्व दिसतं. ज्यानं त्याला इच्छीत वर दिले, त्याच शंकराला कैलासातून लंकेत नेवून गुलाम करण्यासाठी त्यानं कैलास पर्वतच उचलण्याचा प्रयत्न केला. यातून अहंकार दिसतो. सीतेला पळविण्यातून त्याचा उन्मादपणा दिसतो. दशरथाचा राजमुकूट पळविण्यातून चोरप्रवृत्ती दिसते. तसेच या सर्वच गोष्टीतून बोध न घेता, प्रत्यक्ष समुद्र ओलांंडून आलेला राम किती शूरवीर असेल, याचा अंदाज न लावता त्यानं शरणागती पत्करली नाही. यातून त्याचा इगो प्रॉब्लेम दिसतो. एवढं होवूनही त्यानं सर्वच आप्तांना मरायला लावले. यातून तो माणूसकीचा नव्हता हे दिसून येते. ते सर्वच मरण पावल्यावरही त्याला माहित होते की मिही मरणारच आहे. तरीही तो युद्धाला समोर गेला आणि मरण पावला. हे शूरवीराचं लक्षण आहे. त्याला वाटलं की मी जगून काय करु. लोकं काय म्हणतील? या सर्व विचारानं तो युद्धाला समोर गेला व मरण पावला. हे त्याचं बरोबर होतं. परंतू त्यावेळीही त्यानं आपल्या पत्नीचा मंदोदरीचा विचार केला नाही. यातून त्याचा अविचारीपणा दिसतो. मात्र मरतांना अंतिम समयी तिचा हात त्यानं विभीषणाच्या हातात दिला. म्हटलं की विभीषणा, हिच्याशी विवाह करुन हिला आपली पत्नी म्हणून इज्जतीनं वागव. त्यावेळी तिची काय इच्छा होती, हे रावणानं विचारात घेतली नाही. यातून त्याची पुरुषपणाची जिद्द दिसून येते. महत्वाचं म्हणजे रावण तर गेला. त्याचे होते नव्हते, तेवढे झाले. लोकं त्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळू लागले. कारण तसल्या वाईट प्रवृत्या समाजातून नष्ट व्हाव्यात. परंतू लोकांनी त्यापासून बोध घेतला का? नाही. ते रावण दहन करतात. परंतू आपल्यातील वाईट प्रवृत्या सोडत नाहीत. आजही समाजात असे इंगो प्रॉब्लेम आह्त. मलाच श्रेष्ठ म्हणा, इतरांना नको, ही भावना आहे. आपल्यापेक्षा लाचार, गरीबांवर वर्चस्व गाजविण्याची रावणासारखी हुकूमशाही गाजविण्याची सवय आजही आहे. आजही लोकं कित्येक गरीब, लाचार विभीषणाला लाथाच मारतांना दिसतात रावणासीरख्या. तसेच आजही कित्येक माँसं आपल्याला मदत करणा-या लोकांची मदत विसरुन त्यांनाच शिव्या हासडतात. जसा रावणानं कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. आजही कित्येक माणसं दशरथासारखे राजमुकूट चोरुन नेतात. त्यानं तर वालीच्या घरी चोरी केली. आजची माणसं आपल्याच स्वतःच्या घरी चोरी करतात. त्यानं आपल्या इगोसाठी आपल्या आप्तांना दावणीवर लावलं आणि आताची मंडळी आपल्या स्वार्थासाठी आपल्या आप्तांना दावणीवर लावतात. त्यानं आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेला पळवलं. आज आम्ही आपल्याच बहिणीवर बलत्कार करतो. त्यानं मरतांना आपली पत्नी विभीषणाच्या हाती दिली. तिचं संरक्षण व्हावं म्हणून आणि आपण जीवंतपणीच पैसा कमविण्या आपल्या पत्नीच्या देहाचा सौदा करतो. महत्वाचं म्हणजं आपल्यात आज रामाचे नाहीतर रावणाचे पूर्णच गुण अगदी कुटकूट भरले आहेत. आपल्याला रावणदहनाचा अधिकार नाही. कारण आपण तसं वागतच नाही. रामासारखं कधीच बनण्याचा प्रयत्न करीत नाहीत. राम आदर्श होता. मर्यादा पुरुषोत्तम होता. त्याची मरणापर्यंत एकच भार्या होती. संकटं आली तरी. अन् आपण आपल्या पत्नीला दगा देवून अनेक पत्नी करतो. मग आपण खरंच रावणाचं दहन करायला लायक आहोत का? याचाच अर्थ नाही असा निघतो आणि आपण जर लायक नाही तर आपण रावणाचं दहन का कराव? गंमत येते म्हणून की दृष्ट प्रवृत्ती संपावी म्हणून. महत्वाचं म्हणजे आपल्याला रावणदहनाचा काहीच अधिकार नाही. अधिकार त्यांनाच आहे. जे चांगल्या गुणसंपन्नतेनं वागतात. आपल्यात रावणाचे वा रावण प्रवृत्तीचे, एकही गुण ठेवीत नाहीत. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे जर आजपासून ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली असेल की मी पुढील वर्षीपर्यंत रामासारखं बनेल. रावण प्रवृत्तीचे एकही गुण ठेवणार नाही वा आजपासून सात्वीक बनत आहे. त्यांनी त्यांनी रावण दहन स्वखुशीनं करावं आणि जे असा विचार करीत नसेल, त्यांनी कृपया रावणदहन करु नये वा ते दहन होत असतांना आपल्या उघड्या डोळ्यानंही पाहू नये म्हणजे झालं. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
12:14 pm, December 23, 2024
26°
टूटे हुए बादल
Wind: 3 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!