DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:– इचलकरंजी शहापूरातील विनायक हायस्कूल मध्ये शाहीरी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विनायक हायस्कूल मध्ये प्रबोधन शाहिरी कलापथक संस्था इचलकरंजी यांच्या वतीने बालवाडी ते पाचवी च्या सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना शायीरी व पोवाडयांचा १० दिवसाचा शाहिरी पोवाडा ट्रेनिंग शिबिर घेण्यात आले. प्रबोधन शाहिरी कलापथक संस्थेचे अध्यक्ष शाहीर हिंदुराव लोंढे यांच्यासह कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बहुजन सामाजिक संघाचे अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे, म.रा. महिला प्रमुख शोभा वसवडे उपस्थित होते. शाहीर हिंदुराव लोंढे यांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य शाहिरी पोवाडे शिबिर घेऊन महाराष्ट्राचा इतिहास हा शालेय विद्यार्थ्यांपासून रूजावा या उद्देशाने शिबिर आयोजित केले होते. संघटनेचे अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे यांनी शाहीर हिंदुराव लोंढे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे वेळी पोवाडा गायन कु. श्रेया भिसुरे यांनी केले यावेळी सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शिबिर प्रमुख शाहीर संजय जाधव, ढोलकी वादक संदीप देसाई हार्मोनियम वादक अतुल पाटील व सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.