नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विश्व रजक महासंघातर्फे धोबी समाजाला अनुसूचित जात आरक्षणासंदर्भात दिल्लीत एल्गार!

वार्ताहर, दिल्ली/पुणे : संपूर्ण भारतातील रजक समाजाला एक राष्ट्र, एक जात, एक जातीच्या वर्गात आणण्यासाठी विश्व रजक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन ८ व ९ एप्रिल रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर भवन झंडेवालान, नवी दिल्ली येथे होणार असल्याचे संस्थापक श्री. रंजीत कुमार राष्ट्रीय कायदा समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे, पुणे यांनी सांगितले. भारतातील सर्व राज्यांमध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले पाहिजे, कारण भारतात धोबी जातीला काही राज्यात अनुसूचित जातीमध्ये तर काही राज्यात मागास/ओबीसी जातीमध्ये ठेवले आहे, भारतातील सर्व धोबी समाजाची जीवनशैली भारतभर सारखीच असून ते लोकांचे अस्वच्छ कपडे धुतात त्यामुळे त्यांस पूर्वीपासून अस्पृश्यतेची वागणूक दिली जात होती व आहे. शाळांमध्ये संत गाडगे महाराजांचे सविस्तर चरित्र आणि त्यांनी केलेल्या कार्याचा तपशील शिकवला पाहिजे तसेच 23 फेब्रुवारी हा संत गाडगे महाराजांचा जन्मदिवस राष्ट्रीय संत गाडगे स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण भारतभर स्वच्छता दिवस म्हणून राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. प्रत्येक राज्यात संत गाडगे बाबांच्या नावाने धर्मशाळा, हॉस्पिटल, वसतिगृह, शाळा स्थापन करून संत गाडगे शिष्यवृत्ती योजना राबवावी आणि धोबी समाजातील लोकांच्या व तरुणांच्या प्रगतीसाठी तसेच विकासासाठी तात्काळ धोबी आयोग स्थापन करून भारत सरकारने गाडगे बाबांना भारत रत्न त्वरीत घोषित करावा या व अन्य विषयाबाबत अधिवेशनात आक्रमकतेने पावले उचलून मसुदा तयार करणार असून झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी एल्गार करणार असल्याचे रजक संघाचे संस्थापक सौ. संगीता ननावरे, उप विधी समिती अध्यक्ष प्रसाद ननावरे, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चिंतामणी (माजी IES), वरिष्ठ जन. सचिव सी.डी.राम कनोजिया, जन. सचिव सौ. कांता चौहान, राष्ट्रीय सचिव मुन्नालाल कनोजिया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. पूजा कनोजिया, उप महिला अध्यक्षा सौ. पूनम बेनिवाल, श्री. प्रागी लाल जी आदी परिश्रम घेत आहेत. अधिवेशनाला भारतातून अधिकाधिक लोकांनी आपल्या हक्कांच्या लढण्यासाठी अवश्य यावे यासाठी ऍड. संतोष शिंदे, पुणे तसेच श्री. रंजीत कुमार यांनी अधिक माहितीसाठी मोबा क्रमांक-7507004606 वर संपर्क साधण्यास सांगितले आहे!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
11:29 pm, December 22, 2024
22°
छितरे हुए बादल
Wind: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:03 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!