DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- इचलकरंजी शहरातील प्लेयर्स पान शॉपमध्ये मावा विक्री करीत असलेल्या पान शॉपवर इचलकरंजी पोलिसांनी कारवाई करत तंबाखू जन्य पदार्थ व तयार मावा जप्त केला. इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी आरोपी निखील दत्तात्रय रसाळ वय .24 राहणार जवाहरनगर गणपती मंदीर जवळ, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
प्लेयर्स पान शॉपमध्ये 1,080 रुपयाच्या एकूण 36 माव्याच्या पुड्या त्यामध्ये सुगंधी तंबाखू, सुपारीचे मिश्रण असलेली प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळलेल्या पुड्या प्रत्येकी 30 रूपये किंमतीच्या मिळुन आल्या
आरोपी याने प्लेयर्स पान शॉपमध्ये अवैध्यरीत्या सुगंधी तंबाखू, सुपारी व वेगवेगळ्या पत्यांचे मिश्रण तयार करुन त्याचा मावा बनवुन त्यास कोणतेही लेबल न लावता अथवा त्याचेवर सुरक्षेबाबतचा कोणताही वैधानिक इशारा लिहीलेला नसताना विक्री करताना मिळून आला. यातील फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी सरकारतर्फे दिले फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी
आरोपीवर सिगारेट अॅन्ड टोबॅको प्रोडक्टस अॅक्ट 2003 चे कलम 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.