माकडीची फिरती दुकान चर्चेत
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- पोलीस स्टेशनकडून लाल झंडी दाखविण्यात आलेली असतांनाही काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक पोलिसांना न जुमानता येथे सट्टा व्यवसाय चालवीत आहेत. शहरातील काही महत्वाच्या ठिकानांसह गल्लीबोळात सट्टापट्टीचे खुलेआम अड्डे सुरु असल्याणे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केल्या जात आहे.
रामधन चौक, सिद्धार्थ नगर, पहाडपुरा, आंभोरा रोड, बस स्टॅन्ड, बैल बाजार इत्यादी ठिकानी सट्टा घेणाऱ्यांची व लावणाऱ्यांची रोज गर्दी असते.
कल्याण, मणिपूर, राजधानी, कुबेर हे सट्ट्याचे लोकप्रिय प्रकार असून यावर येथे मोठ्या प्रमाणात खायवाडी केली जाते.
सट्टा हा खेळ आमिषे दाखवून मोहात पाडणारा आहे. एकदा याची लत लागली की ती सहसा सूटत नाही. सट्ट्याच्या नादी लागून यापूर्वी अनेकजण कर्जबाजारी झाल्याची उदाहरणे आहेत. येथे प्रामुख्याने सट्टा लावणारे मजूर व कामगार आहेत. घाम गाळून कामावलेले पैसे ते सट्ट्यात उडवून त्यांचे संसार उध्वस्त करतात. सट्टा लावणाऱ्यांत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या खेळातील ‘ ओपन फरक ‘ च्या आहारी जाऊन ते स्वतःचे भविष्य चौपट करीत आहेत. तर दुसरीकडे धंदा चालवीणारे महिन्याकाठी लाखोची कमाई करून त्यांच्या तिजोऱ्या भरत आहेत.
—-> माकडीची फिरती दुकान चर्चेत
सट्टा घेणाऱ्यात माकडीच्या फिरत्या दुकानाची चांगलीच चर्चा आहे. मोटार सायकलने गावभर फिरून ग्राहकांकडून पट्टी घेणे व सट्टा लागला की ग्राहकाला घरपोच चुकारा पोहचवून देणे. हे काम माकडी मागील अनेक वर्षांपासून करीत आहे. माकडीच्या या फिरत्या दुकानाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.