प्रतिनिधी- राहुल आगळे
DPT News Network नंदुरबार:- शहादा खेतिया रस्त्यावरील लोणखेडा गावाजवळ शहादा कडे येणारी कार डिव्हायझर वरती आढळल्याने अपघात झाला. सुदैवाने कार मध्ये बसलेले तीन जण वाचले आहेत कार क्रमांक (एम एच ३९ एबी ५५२३) लोणखेडा गावाकडून जाणारी कार शहदाकडे जात असताना लोणखेडा गावातून कार चालकाला अंदाज न आल्याने डिव्हायझर वर कार आढळल्याने यावेळी मोठा आवाज झाल्याने काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली कार मध्ये बसलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले व त्यांची मदत केली, सुदैवाने कार ठोकली गेल्याबरोबर कारमधील एअर बॅग उघडल्यावर तिघेजण वाचले असून त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. त्या अपघातात कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे पुढच्या भागाच्या चक्का चुर झाला आहे. विसरवाडी ते खेतिया राज्य महामार्ग चे काम चालू असताना बऱ्याच ठिकाणी धोक्याचे फलक लावलेले नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे सदर रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याने त्या ठिकाणी अनेकदा वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे जलद गतीने काम व्हावे अशी मागणी वाहन धारक व प्रवाशांमध्ये होऊ लागली आहे.