DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप अहिरे
धुळे:- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी दि 20/08/2024 अध्यादेश काढून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे महत्त्वाचे आहे मात्र. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याच्या खर्चाचा भार संबंधित शाळांनीच उचलायचा आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आलेली नाही बदलापूर येथील घटनेदरम्यान या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचे लक्षात आल्याने शालेय शिक्षणमंत्री यांनी बुधवारी पुन्हा एकदा शासन निर्णय काढून सीसीटीव्ही, फुटेज तपासणी सह तक्रारपेटी, सखी सावित्री समिती आदींबाबतही सूचना दिल्या आहेत. या निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन दिवस सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करणे आणि काही आक्षेपार्ह गोष्ट आढळल्यास शाळा प्रशासनाच्या साह्याने तातडीने त्यावर कार्यवाही करणे इत्यादी बाबत सूचना दिल्या आहेत. जि प शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचा खर्च शासन देणार आहे. परंतु खाजगी शाळांना स्वतः निधीची तरतूद करावी लागणार आहे परंतु खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळांना दिले जाणारे वेतनेतर अनुदान हे अत्यंत तुटपुंज्या स्वरुपाचे दिले जात असते तर कायम विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना तर हे वेतनेतर अनुदान देखील मिळतच नाही, यातून हा वाढीव खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सरसकट सर्व शाळांना सीसीटीव्ही साठी निधीची तरतूद सरकारनेच करावी किंवा कॅमेरे उपलब्ध करून दयावे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणतीही घटना टाळता येणार नाही. त्यासाठी त्या कॅमेऱ्यांचे प्रत्यक्ष मॉनिटरिंग होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना शालेय कामकाज करून यांना काम करणे शक्य होणार नाही. त्यासाठी सरकारने शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने एक समिती स्थापन करावी किंवा या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून दयावी. या समितीत किंवा यंत्रणेत सीसीटीव्ही मॉनिटरिंग विषयातील तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उद्देश सफल होण्यास मदत होईल तसेच चुकीच्या घटनांना आळा बसेल त्यासाठी सिसीटीव्ही कॅमेरे सह तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी. अशी मागणी शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदनाव्दारे करण्यात आली.
सदर निवेदन देतेवेळी राज्य संघटक सचिव अशफाक खाटीक, नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्ष किरण मासुळे, तालुका सचिव राजेश शिरुडे, जिल्हा कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, जिल्हा सचिव नानाभाऊ महाले, साक्री तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, धुळे शहर सचिव जी.आर.माळी इ. उपस्थित होते.