प्रतिनिधी हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनिसोबतच अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आल्यानंतर तोंडापूरमधील ग्रामस्थनांनी नराधम मुख्याध्यापकाला बेदम चोप दिला असून शाळेत मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या या मुख्याध्यापकाचे नाव भगवान अवचार असून तो स्कॉलरशिपचे धडे देण्यासाठी विद्यार्थिनींना शाळेत बोलवायचा अशी माहिती आखाडा बाळापूर पोलिसांनी दिली.
तसंच मुख्याद्यापक अवचार हा गेल्या अनेक दिवसांपासून शिकवण्याच्या निमित्ताने मुलींना शाळेत बोलावून अश्लील चाळे केल्याचा आरोप गावातील नागरिकांसह मुलींच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी गावकऱ्यांनी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.