DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- संजय गुरव
मुंबई:- उच्च माध्यमिक विद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक आजपासून परिवारासहित आझाद मैदानावर.राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 अखेरच्या वाढीव प्रस्तावित शिक्षक पदाना मंजुरी न मिळाल्या आज मंगळवार पासून आझाद मैदान मुंबई येथे कुटुंबासहीत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या सरकारने यापूर्वी शिक्षण विभागातील विना वेतन काम करणान्या शिक्षकांना न्याय दिला आहे. शिक्षण विभागातील विना काम करणारा आमचा वाढीव पदावरील शिक्षक वर्षापासून चिरडला जात आहे राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 व 2018-19 वर्षापासून मंजुरी मिळालेली नाही यामुळे सदर पदावर काम करणारे शिक्षक यांच्यावर उपासमार आली आहे.सदर पदांची फाईल तयार असून शालेय शिक्षण व क्रिडा मंत्रालयने वाढिव पदांना आजतागायत मंजूरी दिली नाही त्यामुळे शिक्षक प्रचंड नाराज आहे. असंतोष निर्माण झाला आहे.आंदोलन करण्याची मानसिकता तयार झाली आहे म्हणुन अधिवेशन काळात कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक येथे 24-07-2023 पासून कुटुंबासह म्हणजेच मुलाबाळांसह वृद्ध आई-वडिलही आंदोलन करीत आहोत.
या आंदोलनामध्ये जवळपास 500 च्या वरती व्यक्ती यामध्ये 100 लहान मुले व 200 ते 250 महिला आणि ईतर सहभागी होत आहेत. या सर्व शिक्षकांना भीक मागणीची वेळ आली आहे तरी त्वरित या पदांना मान्यता देउन वेतन पासून वंचित न ठेवण्याची विनंती केली आहे.या पूर्वी देखील राज्यातील सर्व वाढीव पदावरील शिक्षकांनी आंदोलन केलीत यात दोन महिला शिक्षकांचा मुंबईतील लोकल मध्ये प्रवास करतांना अपघात होता होता वाचला तर काहि शिक्षकांचा अचानक बी.पी. वाढल्यामुळे धावपळ करावी लागली व आजपासून पुन्हा हे शिक्षक आझाद मैदानावर आपल्या परिवारासह व वृद्ध माता पित्यासह आंदोलनात सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने आपले ठाण मांडले असून वातावरण खराब झाले आहे जे आरोग्यासाठी धोक्याचे आहे व आंदोलनातील सहभागी वृद्ध व बालकांचा विचार करून त्वरित मागणी मान्य करावी अशी अपेक्षा आंदोलन कर्त्याकडून होत आहे.