( प्रतिनिधी – नंदकुमार नामदास – ठाणे / कल्याण) शिक्षण संवेदन मासिकाच्या 15 व्या वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार 2022 ने प्रा. प्रदीप वाघ आणि प्राचार्य डॉ. माधव गवई ( संस्थापक - संपादक, शिक्षण संवेदन ) यांच्या हस्ते आचार्य आत्रे रंगमंदिर कल्याण येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. कमल गवई , प्राचार्य डॉ सुभाष कंदारे , डॉ. अर्पणा प्रभू, डॉ केशव जाधव, अँड दिलीप वाळूंज, विजयसिंह नाईक ,राजेंद्र पगारे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील विविध नामवंत आणि प्रतिभावंतांचा मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मान यावेळी करण्यात आले. साहित्य विश्वातील समाजभानाची जणीव ठेवून चार्वाक , बुद्ध , तुकाराम या विद्रोही मनाच्या मांदीयाळीत असणारे लेखणीच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्तीवर घणाघाती आघात करणारे लिखाण करणारे कवी नवनाथ रणखांबे आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय , राज्यस्तरीय, विविध पुरस्काराने सन्मानित असून आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय , राज्यस्तरीय, विविध साहित्य संमेलनात त्यांचा विविध अंगाने सहभाग असून कवी संमेलन आणि परिसंवादामध्ये निमंत्रित म्हणून त्यांनी ठसा उमटविला आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विविध साहित्य संमेलन / साहित्य क्षेत्रात कविसंमेलनात ते महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत असतात. मराठी साहित्य चळवळीत आणि आंबेडकरी साहित्य चळवळीत नव्यादमाचा तरुण चेहरा नवनाथ रणखांबे यांनी साहित्य क्षेत्रात अवीट ठसा उमटविला आहे. कवीता, लेख आणि आपल्या सामाजिक कार्याने ते समाज प्रबोधन करीत असतात .
प्रसार माध्यमात जोरदार चर्चा असणारे त्यांचे पहिलेच पुस्तक शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले “जीवन संघर्ष” पुस्तक मराठी साहित्य विश्वात लक्षणीय ठरले आहे. जीवन संघर्ष विविध ऐतिहासिक रेकॉर्डने सन्मानित झाले आहे. इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड २०२० – राष्ट्रीय विक्रम ( सन्मान दिल्ली) , रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड २०२० – राष्ट्रीय विक्रम , महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड २०२० राष्ट्रीय विक्रम आणि ओएमजी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड २०२० – वर्ल्ड रेकॉर्ड ( सन्मान कल्याण) ने जीवन संघर्ष पुस्तक सन्मानित झाले आहे. विविध साहित्य पुरस्कार काव्य लेखन पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१९ (बोरिवली मुंबई) इ.या पुस्तकाला मिळाले आहेत. ते डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड धारक ही आहेत. शिक्षण संवेदन मासिकाच्या 15 व्या भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार 2022 ने सन्मानित केल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.