DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे
सांगली :- मणदुर ता. शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण व मजबुतीकरणाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून इस्टीमेन्ट मोजमापा प्रमाणे झाले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक हव्यासापायी जनतेची व शासनाची फसवणूक केलेली आहे. अल्पावधीतच सदरच्या बांधकामाचा दर्जा घसरला असून मनदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह, कॉन्फरन्स हॉल व इतरत्र स्लॅब गळत असून गुडघाभर पाणी साचत आहे.
बांधकाम अधिकाऱ्यांच्या गैरहजरीत ठेकेदारांनी मनमानी कारभार करून चुकीच्या पद्धतीने इमारतीचे काम केले आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांचे साटे लोटे असल्याने सदरच्या इमारतीच्या कामाची निविदेप्रमाणे कोणतीही तपासणी न करता चांगल्या प्रतीचे काम झाले असल्याचे बोगस कागदपत्रे शासनाकडे सादर करून बिले उचलले आहेत.
तरी शासनाने मनदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे दुरुस्तीकरण व मजबुतीकरणाच्या झालेल्या कामाची कॉलिटी कंट्रोल विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या प्रत्येक घटकावर जनतेच्या व शासनाच्या फसवणुकीबद्दल भारतीय न्यायसंहीतेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय दलित महासंघ व सकल मराठा समाजातर्फे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
युवासेना तालुकाप्रमुख अमोल बडेकर, भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष दयानंद शिवजातक, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील, वसंत कारंडे, युवा सेना सांगली जिल्हा समन्वयक संभाजी राजे पाटील,विनोद आढाव,विठ्ठल मिरुखे, प्रकाश बेबले यांची भाषणे झाली. रंजना खोत धनश्री मोरे उपस्थित होते यावेळी युवा सेना व भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.