DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावातील बायपास रोडवरील कै.भाईदास महादू साळुंके यांच्या शेतातील दत्त नवनाथ मंदिरात १५ डिसेंबर रविवारी रोजी दत्त जयंती निमित्त दुपारी १२ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.
शेवाळी(दा.) येथील दत्त नवनाथ मंदीर येथे साला प्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात आला. वर्ष २०१२ पासून कै.भाईदास साळुंके यांच्या शेतात श्री दत्त नवनाथ मंदीर ची स्थापना करण्यात आली. कै.भाईदास साळुंके हे नवनाथ महाराजांचे भक्त होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ग.भा.सुमनबाई भाईदास साळुंके व दोन मुले, दोन मुली व त्यांचा परिवार आहे.ग.भा.सुमनबाई साळुंके या दरवर्षी दत्त जयंती निमित्त अखंड पारायण स्वता वाचन करतात तर त्यांचे लहान चिरंजीव श्री.कारभारी (महाराज) भाईदास साळुंके हे अंखंड पुजा पाठ करतात तर मोठे चिरंजीव श्री. कन्हैयालाल साळुंके जरी गुजराथ राज्यातील उमरगाव (जि.बलसाड)येथे व्यवसाय निमित्त स्थायिक झाले असले तरी दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम चे आयोजण करण्यासाठीं अग्रेसर असतात.
सकाळी ८ वाजेपासून ग.भा. सुमनबाई साळुंके यांच्या हस्ते दत्त नवनाथ महाराज यांची आरती पुजा पाठ करून लगेचच दुपारी १२ वाजतापासुन महाप्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी रांगेमध्ये शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. गावातील तरूण मिञ मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.