माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वर्षी तालुका शिंदखेडा येथील कृतीशिल शिक्षक श्री यशवंत निकवाडे सर यांची जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,नागमठाण ता.वैजापूर जि.औरंगाबाद यांच्याकडून छत्रपती शिवाजीमहाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे .श्री यशवंत निकवाडे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून ,त्यांनी साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक श्रेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सरांचे आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाले असून त्यांचे ‘जगण्याची संजीवनी ‘हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे. त्यांचे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने अनेक ठिकाणी झालेले आहेत .समाज सेवेत पण सरांचे काम कौतुका स्पष्ट आहे.थंडीचा काळात निराधार व गरजू व्यक्तींना ब्लँकेट,पाणी,अन्नधान्य वाटप करून मदतीचाहात दिला आहे. अनेक मोठ मोठ्या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन पण करत असून त्यांची ह्या पुरस्कारासाठी सार्थ निवड करण्यात आली आहे .त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.