DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण
नंदुरबार -: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला जीवे मारल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमधून समोर आली आहे.
संशयाचं भूत डोक्यावर स्वार झाल्यावर पतीने पत्नीच्या गुप्तांगावर वार केले. त्यानंतर आंब्याच्या झाडावर साडीने लटकवून तिला ठार केले आहे.
जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिंदवाणी बारीपाडा येथे ही संताप जनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी कि, शिंदवाणी बारीपाडा येथे राहणारा बामण्या इरा वळवी हा आपली पत्नी जानूबाई बामण्या वळवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
यावरुन दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. २० जूनला दुपारी १ वाजेच्या सुमारास बामण्या वळवीने त्याची पत्नी जानूबाईवर राग काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
वाद टोकाला गेल्याने बामण्या वळवीने जानूबाईच्या गुप्तांगावर टणक वस्तूने वार करुन तिला गंभीर जखमी केले.
एवढ्यावरच न थांबता तो आपल्या पत्नीला उचलून शेतात घेऊन गेला आणि तिथे असलेल्या आंब्याच्या झाडावर साडी बांधली आणि तिला गळफास लावून जागीच ठार केले.
घटनेची माहिती समजताच धडगाव पोलीस निरीक्षक आर.एम. पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत जानूबाई वळवी यांची सून अनिता दिलीप वळवी यांच्या फिर्यादीवरुन बामण्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
संशयित आरोपी फरार पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपी बामण्या वळवी फरार झाला असून धडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.