ऍट्राॅसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. मा.विकास बल्लाळ.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे
सांगली:- वाकुर्डे,ता.शिराळा येथिल दलित महिला अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवार दि.07 ऑक्टोबर रोजी दलित महासंघाचे वतीने शिराळा तहसीलदार कचेरीवर आसूड मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.विकास बल्लाळ यांनी केले.यावेळी राज्य उपाध्यक्ष मा.शंकर महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे राज्य उपाध्यक्ष मा.नंदकुमार नांगरे व समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विजय चांदणे यांनी सदर मोर्चात सहभागी होऊन जाहीर पाठींबा असल्याची घोषणा केली.
मोर्चा ला संबोधित करताना दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.विकास बल्लाळ म्हणाले, ऍट्राॅसिटी ऍक्ट कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. पोलिस प्रशासनाकडून सदर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक केली जात नाही. कोणतीही कडक कारवाई न झाल्याने ऍट्राॅसिटी ऍक्ट कायद्याचा धाक न राहिल्यामुळे वारंवार दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत.ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.तरी या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करत आहोत.
यावेळी समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विजय चांदणे म्हणाले, पोलीसांनी दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये गांभीर्याने तात्काळ लक्ष घालून आरोपींना अटक करणे गरजेचे आहे.अलिकडच्या काळात ऍट्राॅसिटी ऍक्ट कायद्याचा आणि पोलिसांचाही गावगुंडांवर कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही.तरी पोलीसांनी प्रामुख्याने दलितांच्या न्यायासाठी सतर्क राहावे अन्यथा दलितांना स्वतःच्या संरक्षणासाठी कायदा हातात घ्यावा लागेल.आम्ही संविधानाचा सन्मान करणारे लोक आहोत पण वेळ आली तर आम्ही आद्य क्रांतिकारक मा.लहुजी वस्ताद आणि वीर फकिरा चे वारसदार आहोत हे जातीयवादी व धर्मांध प्रवुत्तींनी लक्षात ठेवा.असा आज ह्या मोर्चाचे नीमीत्ताने आवाहन करत आहोत.
यावेळी दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे म्हणाले,” या महायुतीच्या काळातच दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.पोलीस प्रशासनावर ग्रुहमंत्री फडणवीस यांचा अजिबात वचक राहिलेला नाही.महाराष्ट्रात या पोलीसांच्या अकार्यक्षमता व दलित व महिला अत्याचारांच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.ही मागणी आज रोजी आम्ही करत आहोत.
सदर मोर्चाला मार्गदर्शन करताना डी.पी.आय.चे राज्य उपाध्यक्ष मा.नंदकुमार नांगरे म्हणाले,”दलित महिला अत्याचाराची घटना घडून आठ-दहा दिवस झाले तरी या तालुक्याचे आमदार मानसिंग नाईक यांना त्या अत्याचार पिडीत कुटुंबाला भेट देऊन त्यांना धीर देणे, सांत्वन करणे आवश्यक होते तरीही स्वतःला पुरोगामी समजणार्या आमदारांना वेळ मिळाला नाही हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते.अशा पुरोगामी विचारांचे नाटकी लोकांना इथून पुढे त्यांची जागा दाखवून देऊ.
यावेळी दलित महासंघाचे मा.उत्तम चांदणे, मा.संतोष चांदणे,मा.बापूराव बडेकर,डी.पी.आय.चे लालासो तांबीट,मा.रणधीर कांबळे, यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मा.अजिंक्य बल्लाळ,मा.सागर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे,मा.पांडुरंग बल्लाळ,मा.अमर बनसोडे,मा.सुधीर बाबर,मा.धनाजी घेवदे,मा.बापू सकटे,मा.अरुण सकटे,मा.तानाजी सकटे,मा.संतोष तडाखे,मा.संतोष लोंढे,मा.सुरेश सकटे, हे पदाधिकारी उपस्थित होते.सौ.सानिका सकटे,सौ.प्रियांका सकटे,सौ.अंजना सकटे,सौ.शुभांगी सकटे,सौ.काजल सकटे या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सदर मोर्चात शिराळा तालुक्यातील वाकुर्डे,औंढी,करमाळे,मणदूर,सोनवडे,मांगले, शिराळा,अंत्री,पणुंब्रे,कोकरुड,चरण, चिंचोली,नाठोली, वाळवा तालुक्यातील नेर्ले,पेठ,कामेरी,इस्लामपूर,कार्वे, ऐतवडे खुर्द,चिकुर्डे, कासेगाव, काळम्मावाडी इत्यादी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.