DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची नविन तालुका व विविध विभागांच्या कार्यकारिणी पदाधिकारी ची आढावा बैठक धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली साक्री शासकीय विश्रामगृहात येथे बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय अहिरे. डॉ नितीन सुर्यवंशी, शैला राऊत, विलास देसले, विजय गांगुर्डे, ताहीर बेग मिर्झा, जितेंद्र बिरारीस, राजेश बागुल, विजय भामरे, पवन सदाशिव, विलास जाधव, निलेश राणे, प्राजक्ता देसले, प्रकाश शिरसाठ, राकेश शेवाळे, भैय्या सावळे, अँड विवेकानंद पिंपळे, कातीलाल माळी,राहुल वाघ, हर्षल सोनवणे, जुबेरपठाण, रावसाहेब सावळे, ज्ञानेश्वर देसले, विजय सोनवणे, किशोर अहिरराव व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थितीत होते यावेळी शेतकी संघाचे नुतन संचालक विलास देसले व मार्केट कमिटी चे नुतन संचालक जितेंद्र बिरारीस, साकी तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष, प्राजक्ता.देसले, अल्पसंख्याक विभागाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष करीम शहा, धुळे जिल्हा सामाजिक न्याय चे कार्याध्यक्ष भैय्यासाहेब सावळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करा मोठ्या प्रमाणात लोक पार्टीत जुडत आहे पक्षाच्या विस्तार वाढत आहे लवकरच जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येईल. सर्व समाजाला सोबत घेऊन पक्ष विस्तार जिह्यात करणार आहे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी अध्यक्ष अजीतदादा पवार यांचे हाथ बळकट करा असे आवाहन केले आहे, यावेळी सुत्रसंचलन विलास देसले यांनी केले व आभार विजय भामरे यांनी मानले व बैठक खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली.