DPT NEWS NETWORK ✍️.
दहिवेल प्रतिनिधी : राहुल राठोड
साक्री: तालुक्यातील दहिवेल येथे चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून
सदर चोरांचा शोध लवकर लागावा यासाठी दहिवेल आऊट पोस्टचे पोलिसांसमोर मोठें आव्हान उभे केल आहे.दहिवेल गावातील योगेश्वर कॉलनी परिसरात श्री शांतीलाल जवाहरलाल भोये वय ३५. जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक यांच्या घरी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे. सविस्तर वृत्त असे की शांतीलाल भोये व मुलगा ,पत्नी सह योगेश्वर कॉलनी मध्ये परिवारासह राहतात दिनांक २. रोजी सायंकाळी ५.३०. वाजेच्या सुमारास परिवारासह राहते घराला ग्रुप लावून निळगव्हाण येथील त्यांचे सहकारी मुख्याध्यापक श्री रवींद्र निंबा मोरे यांच्या गावी परिवारासह मुक्कामाला गेले असता दि.३. रोजी सकाळी १०.वाजेच्या सुमारास ते त्यांच्या परिवारासह घरी परत आले तेव्हा त्यांच्या घराचे पुढच्या दरवाजाच्या कडी कोंडका तुटलेला दिसला व घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तुटलेले व त्यांच्यामधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला तेव्हा ते घरात जाऊन खात्री केली की कोणीतरी अज्ञात इसमाने घराच्या पुढच्या दरवाजा च्या कडी कोंडका तोडून पैशांसह मुद्देमाल कपाटातील काढून घेतला आहे. अस त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते शोधाशोध करू लागले त्यात १५. ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नेकलेस हार ,७. ग्रॅम वजनाचे कानातले तुंगल ,४ ग्रॅम वजनाचे कानातले झुमके ,१० ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र ,८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे होम पान ,५ बहार वजनाचे चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम दहा हजार १००००. रुपये पैशांसह चोरट्याने वस्तू लांबवली आहे.जवळपास पाच लाख रुपये (५०००००/-) रुपये किमतीची डाग दागिने घेऊन पैशांवर डल्ला मारला आहे तरी याचा शोध लागावा त्यामुळे सदर शिक्षकाने सोन्या चांदीचा व रोख रक्कमचा शोध लागावा यासाठी साक्री पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंद केली आहे.