*९,५६,१०० रू. किमतिचा मुद्देमाल केला जप्त*
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, साक्री पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दहिवेल दूर क्षेत्राच्या परिसरात काही इसम मालट्रक व चारचाकी वाहनांमध्ये वापरात येणारे डी.ई.एफ युरियाचे बनावट उत्पादन करीत आहे. त्यावरून साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून कारवाई केली. आरोपी रुपेश राजेंद्र गवळी (वय २७ ) वर्ष रा. दहिवेल ता. साक्री जि. धुळे यास अटक करण्यात आली तर अनिल वेडू खलाणे रा. ता. शिरपूर जि. धुळे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्या ठिकाणी ७,५०,००० रू किमतीचे टाटा कंपनीचे बनावट डी.ई.एफ. रसायन १,५०,००० रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या पंधरा टाक्या व इतर साहित्य असा एकूण ९,५६,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
टाटा कंपनीचे अधिकारी सागर अशोक बावनावे यांनी कंपनीतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १५/०८/२०२३ रोजी साक्री पोलीस स्टेशन येथे गुरनं २५८/२०२३ कॉपीराईट कायदा सन १९५७ चे कलम ५१,६३ सह भा.द.वि.का.क ४२०,४८३ सह ट्रेडमार्क अधिनियम सन १९९९ चे कलम १०३,१०४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड सो, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग साक्री साजन सोनवणे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम व त्यांचे सहकारी पोसई. गणेश कोळी, असई. राजू जाधव, पोहेकाॅ. संजय शिरसाठ, पोहेकाॅ. उमेश चव्हाण, पोना. शांतीलाल पाटील, पोकॉ. भूषण वाघ, पोकॉ. दिनेश मावची, संतोष मोरे, निखिल काकडे, असई महेंद्र वानखेडे, पोहेकाॅ अनिल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. असून पुढील अधिक तपास पोसई रोशन निकम करीत आहेत.