सातारा प्रतिनिधी – विनोद घोरपडे
गुन्हा रजिस्टर नंबर 342/2022 भा द वी कलम 279,304(अ),337,338 मो वा का कलम 184,134(अ)(ब)
सातारा : दिनांक 21 रोजी पहाटे 02 वाजेच्या पूर्वी शेंद्रे ता. जि. सातारा गावचे हद्दीत सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या हायवे रोडवर अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या बाजूस हायवे पुलावर अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 वर्ष यांचा अपघात होऊन अपघातात डोक्यास दोन्ही पायास कमरेस दोन्ही हातांना गंभीर दुखापत होऊन सदर इसम मयत झालेले आहेत.
मयताचे वर्णन खालील प्रमाणे
अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 वर्ष, डोक्यावर टक्कल व बारीक पांढरे केस, उजव्या छातीच्या खाली 1 तीळ, कपड्याचे वर्णन फुलबाहीचा पांढरा शर्ट त्याचे खिशावर आदर्श असे मराठी नाव असलेले व काळसर चॉकलेटी फुल पॅन्ट अंगात फुल बाहीचे पांढरे बनियन व नाडी असलेली लाल रंगाची हाफ पॅन्ट सोबत काळ्या दोरीला बांधलेला किल्ल्यांचा बंडल देखील आहे.
सदर इसमाबाबात काही माहिती असल्यास अगर ओळख पटल्यास सातारा तालुका पोलीस ठाणेच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा
पोलीस निरीक्षक श्री घोडके साहेब मोबाईल नंबर 9922121121
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौधरी साहेब 9767752908