DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर :- येथील सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व्दारा आयोजीत मासिक काव्यमैफल लोट्स इंटरनॅशनल स्कूल, हरियानगर,मूर्तिजापूर येथे अतिशय आनंदात संपन्न झाली.सर्वप्रथम कार्यक्रमात ग्रामगीता ग्रंथाचे पूजन अध्यक्ष कैलास सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर अध्यक्ष्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ज्ञानदेव भड यांनी केले. राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णु लोडम यांची निवड झाल्याबद्दल, त्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कमलनारायण जयस्वाल यांनी केला. उपस्थित कवींचे शब्दसुमनांनी स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र जवादे यांनी केले.
यानंतर, ज्ञानदेव भड, कमलनारायण जयस्वाल, रवींद्र जवादे, विनोद महल्ले, रामकृष्ण आसरे, सुनिल डोंगरदिवे, कैलास सोळंके, विष्णु लोडम, मिलिंद इंगळे यांनी आपल्या रचना सादर केल्या. मुख्याध्यापिका लता सोळंके यांची उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवर कवींच्या पावसावरच्या रचनांनी मैफलीत आनंद निर्माण केला.उपस्थित कवी व रसिकांनी सदर मैफलीचा भरभरून आनंद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जवादे व आभार प्रदर्शन मिलिंद इंगळे यांनी केले. ‘हीच आमची प्रार्थने’ ने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
या मैफलीच्या सहआयोजनामध्ये गझलदीप प्रतिष्ठान, कलाविष्कार बहु.संस्था, नेहरू युवा मंडळ, मूर्तिजापूर यांचे सहकार्य लाभले.