नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सोनगीर पोलीसांची धडक कारवाई, गुटख्याचा कंटेनरसह 21,61,320/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त



DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- महेश देवरे


धुळे :- धुळे जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक यांच्या आगमना पासून अवैध व्यवसायावर कारवाईची सिरियलच चालू झाली आहे. दिनांक 06 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलले अपायकारक पानमसाला व गुटख्याचा कंटेनर ट्रक क्रमांक MH04 KU5448 मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उददेशाने दिल्ली कडुन धुळे कडे येत आहे अशी बातमी सोनगीर पोलीसांना मिळाल्यावरुन सोनगीर पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी हे सोनगीर टोल नाक्याजवळ जावुन थांबले असतांना दिनांक 06 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सोनगीर टोलनाक्यावर सदर वाहन चालकास थांबवुन सदर गाडीची तपासणी केली असता त्यात राजनिवास, विमल, राजश्री, झेड एल-01 व पानमसाला व तंबाखूच्या गोण्या भरलेले 32 बॉक्स मिळुन आले आहेत. सदर वाहनावर कारवाई केली असुन सदर कारवाईत सुमारे 06,61,320 /- रुपये किंमतीचा पानमसाला (गुटखा) व 15,00,000/- रुपये किंमतीचा कंटेनर ट्रक क्रमांक MH04 KU5448 असा एकुण 21,61,320/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर वाहनावरील चालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी यांना माहिती देण्यात येवुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

सदर कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक व सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, अ.स.ई. किरण राजपुत पो.हे.कॉ. नरेंद्रसिंग गिरासे, पो.हे.कॉ.संजय देवरे, पो.ना.अमरीश सानप, पो.कॉ. राहुल पाटील, विजयसिंग पाटील यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
7:40 am, December 23, 2024
19°
साफ आकाश
Wind: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!