नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, OnePlus-रेडमीसह ‘या’ ब्रॅंड्सच्या स्मार्टफोन्सचे लाँचिंग लवकरच, पाहा लिस्ट

एप्रिलमध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले असून यात आणखी काही नावे जोडली जाऊ शकतात. कारण, येत्या काही आठवड्यांत आणखी अनेक टेक लाँच इव्हेंट्स दिसू शकतात. ज्यामध्ये कंपन्या त्यांची नवीन उत्पादने सादर करू शकतात. या यादीत Realme, OnePlus पासून Redmi, Xiaomi पर्यंतचे फोन समाविष्ट आहेत. OnePlus २८ एप्रिल रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. जिथे कंपनी दोन नवीन फोन तसेच वायरलेस इयरबड्सची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. यासह, Xiaomi त्याचा फ्लॅगशिप 12 Pro फोन लाँच करेल. याशिवाय, २० एप्रिल रोजी Redmi 10A लाँच देखील पाहू शकतो. म्हणूनच, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काही दिवस थांबा आणि भन्नाट स्मार्टफोन खरेदी करा. एप्रिलमध्ये लाँच होणार्‍या सर्व आगामी स्मार्टफोन्सची संपूर्ण माहिती येथे पाहा .

Realme भारतात आणखी एक स्मार्टफोन लाँच करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीने अलीकडेच Realme GT 2 Pro, Realme 9 SE आणि इतर डिव्हाइसेस सादर केले आहेत. आता Realme Narzo 50A प्राइम लाँच करण्याची योजना आहे. टिपस्टरने दावा केला आहे की, फोन ३० एप्रिल रोजी लाँच होणार आहे. हा एक बजेट फोन असू शकतो. जो इंडोनेशियामध्ये आधीच उपलब्ध आहे. डिव्हाइस ६.६ -इंच FHD+ डिस्प्ले आणि ५००० mAh बॅटरीसह येते. Realme Narzo 50A प्राइममध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये मॅक्रो आणि पोर्ट्रेट शॉट्ससाठी ५० -मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २-मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश आहे.

OnePlus 10R भारतात कधी लाँच केले जाईल हे कन्फर्म नाही. आतापर्यंतच्या लीक्सने असे सुचवले आहे की त्याच इव्हेंटमध्ये OnePlus 10R ची घोषणा केली जाऊ शकते. हे OnePlus 9R चा उत्तराधिकारी असेल. अहवालानुसार OnePlus India चे CEO नवनीत यांनी कन्फर्म केले आहे की, ब्रँड लवकरच नवीन OnePlus R सीरीज फोन आणेल. डिव्हाइसचे कोणतेही अधिकृत कन्फर्मेशन नसले तरी, OnePlus 10R चे वैशिष्ट्य आणि डिझाइन आधीच ऑनलाइन समोर आले आहे. टिपस्टरच्या मते, OnePlus 10R मध्ये MediaTek 8100 SoC, ६.७ -इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले आणि OnePlus 9RT सारखा ५० MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.

अद्याप Redmi 10A भारतात लाँच करण्याबद्दल काही कन्फर्म नाही. परंतु असे मानले जात आहे की, डिव्हाइस २० एप्रिल रोजी आणले जाईल. जवळ-जवळ दोन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या Redmi 9A स्मार्टफोनचा हा सिक्वेल असेल. या वर्षी कंपनी हा एंट्री-लेव्हल फोन लाँच करू शकते. Redmi 10A चीनमध्ये आधीच उपलब्ध आहे. हे सूचित करते की Redmi 10A 9A पेक्षा किरकोळ अपग्रेड असेल. Redmi 10A चे चीनी मॉडेल समान MediaTek Helio G25 SoC ने सुसज्ज आहे. यात ५००० mAh बॅटरी, ६.५३ इंचाचा HD+ डिस्प्ले आणि मागील बाजूस १३ -मेगापिक्सेल सिंगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.

OnePlus Nord CE2 Lite: आत्तापर्यंत, OnePlus Nord CE 2 Lite भारतात लाँच होणार की, नाही याबद्दल काहीही कन्फर्म नाही. कंपनीने नुकतेच उघड केले आहे की, एक नवीन OnePlus इव्हेंट २८ एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी, कंपनीNord CE 2 Lite लाँच करेल, ज्याची किंमत भारतात सुमारे २०,००० रुपये अपेक्षित आहे. नावाप्रमाणेच, ही OnePlus Nord CE 2 ची टोन्ड-डाउन आवृत्ती असेल. जी, अलीकडेच भारतात २३,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच करण्यात आली होती .OnePlus च्या चाहत्यांसाठी OnePlus Nord CE2 Lite एक चांगला पर्याय ठरेल यात दुमत नाही.

नामांकित टेक ब्रँड आपला प्रीमियम आणि फ्लॅगशिप फोन Xiaomi 12 Pro २७ एप्रिल रोजी भारतात लाँच करणार आहे . हे डिव्हाइस आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध आहे आणि आता ते भारतात देखील येत आहे. Xiaomi 12 Pro क्वालकॉमच्या टॉप-नॉच स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे, जे आधीच अनेक २०२२ फ्लॅगशिप फोनला पॉवर करत आहे. Xiaomi 12 Pro ची किंमत जवळपास ६५,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जे सूचित करते की, Xiaomi डील अधिक आकर्षक बनवण्यासाठी OnePlus 10 Pro पेक्षा किंचित कमी किंमत ठेवण्याचा विचार करत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
10:45 pm, December 22, 2024
23°
छितरे हुए बादल
Wind: 12 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:03 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!