DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उभंड पैकी दगडीविहीर या गावाला ७५ वर्षानंतर प्रथमच उपसरपंच पद मिळाले उपसरपंच पदी सौ. संगीता प्रेमचंद राठोड हे विराजमान झाल्याने गावात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला, पॅनल प्रमुख श्री योगेश न्हानु पाटील यांनी दिलेला शब्द पाळला त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले.
लोकनियुक्ती सरपंच सौ. मोनाली योगेश पाटील व निवडणूक अधिकारी हिमांशू पाटील व ग्रामसेवक उमाकांत खैरनार सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत उपसरपंच पदी सौ. संगीता प्रेमचंद राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई पुनाजी भिल, ग्रामपंचायत सदस्य राजेशबाई रूपसिंग मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई संजय भिल व पॅनल प्रमुख योगेश न्हानु पाटील, योगेश पाटील, चैत्राम पाटील, रूपसिंग मोरे, सुरेश बच्छाव, शरद पाटील वसंत माळी, ईश्वर पाटील, किशोर पाटील, विजय पाटील, सुरेश पाटील, चंदन पाटील, छोटू भटू पाटील, हिरामण पाटील, धोंडीराम पवार, संजय राठोड, सागर पाटील, यशवंत पवार, समाधान पाटील, यशवंत पवार, रामदास मोरे, अशोक राठोड व अंबालाल नेरकर पत्रकार राहुल राठोड शिपाई शरद पाटील गावातील जेष्ठ मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.