DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
सातारा :- सातारा शहर पोलीस ठाणेस दिनांक १५/०८/२०२३ रोजी गुरुनं ६४८/२०२३ भा.द.स कलम ५९५अ, १५३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobixx_70 या इंस्टाग्राम अकॉटवरून छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) प्रसारीत झालेबाबत नमुद केले होते. सदर गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (CIU यूनिट) सातारा यांचे पथकाने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobixx_७० या इंस्टाग्राम अकाउंट बाबत तांत्रिक माहिती इंस्टाग्राम यांचेकडुन प्राप्त करुन घेतली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर माहितीमधुन अमर अर्जुन शिंदे राहणार मु.पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा याची माहिती निष्पन झाली आहे.
सदर गुन्ह्याचे अनुशंगाने संशयीत अमर शिंदे यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता अमर शिंदे हा त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरून मैत्रिणीसोबत चॅटिंग करीत होता. सदर मैत्रिण हि विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचेसोबत देखील इस्टाग्रामवर संपर्कात होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने आरोहि या महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून सदर अकाउंटवरुन विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे सोबत चॅटिंग करू लागला. सदर अकाउंटवरून चॅटिंग करत असताना आरोपीने विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचा विश्वास संपादन करुन त्याचेकडुन त्याचे nobixx_70 या इस्टाग्राम अकाउंटचा आयडी व पासवर्ड प्राप्त करुन घेतला. त्यानंतर आरोपी नामे अमर शिंदे याने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख यास लोकांनी शिवीगाळ करावी, त्याची बदनामी व्हावी. त्यास शिक्षा मिळावी व तो त्याचे मैत्रिणीपासुन दुर व्हावा या हेतुने दिनांक १५/०८/२०२३ रोजी छ. शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इस्टाग्रमा स्टोरी) nobixx_70 या इंस्टाग्राम अकॉटवरून प्रसारीत केली.
सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करीत असताना विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचे nobixx_७० या नावाचे इस्टाग्राम अकाउंट हे आरोपी नामे अमर अर्जुन शिंदे राहणार मु.पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा हा वापरत असलेबाबत माहिती इस्टाग्राम व मोबाईल कंपनी यांनी दिलेले माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन प्राप्त झाली आहे.