नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

६० लाखांची हेराफेरी करणारा टपाल खात्याचा अधिकारी, CBI च्या जाळ्यात

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- दत्तात्रय माने. रत्नागिरी : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे टपाल खात्यातील एका कर्मचाऱ्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या २६० बचत खात्यांमधून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी यासंबंधी माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन परसराम गुट्टे यांनी २०१८-२० पासून आंजर्ला उप पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी बनावट व्हाऊचर तयार केलं होतं. त्यामध्ये एकतर मयत किंवा नियमित लाभार्थी नसलेल्या लाभार्थ्यांच्या सह्या आणि अंगठ्याचे बनावट ठसे त्यांनी घेतले. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण गुट्टे याने संजय गांधी योजना, श्रवण बाल योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांसारख्या सामाजिक कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या बचत खात्यामधील पैशांचा उधळपट्टी केली आहे.

खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सेंट्रल बँकिंग सॉफ्टवेअर ‘फिनॅकल’ वापरता येत नव्हता. त्यामुळे खात्यातून पैसे गायब करणे सहज शक्य झाले. तर नेटवर्कच्या समस्येमुळे प्रलंबित असलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो कामाच्या वेळेनंतर दुसऱ्या कार्यालयात जायचा. तिथे त्याने सीबीआय फिनॅकलमधील बचत बँक खात्यांशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी पोस्टल असिस्टंट आणि सब-पोस्टमास्टरचा वापरकर्ता आयडी वापरला आणि सर्व काम स्वतःच केलं, असाही आरोपी एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, रत्नागिरी टपाल विभागाने दाखल केलेल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तरांनी २७ जुलै २०२० रोजी यासंबंधी माहिती दिली आणि त्यानंतर फसवणूक झाली असल्याचं उघडकीस आलं. खातेदारांच्या खोट्या सह्या किंवा अंगठ्याचे ठसे बनवून सुमारे २६० खात्यांमधून ६० लाख रुपये त्यांनी काढून घेतले होते. अनेक दिवस खातेदारांकडून ही खाती चालवली जात नसल्याने आरोपी गजानन गुट्टे याने ही खाती टार्गेट केली. टपाल खात्याने गुट्टे यांच्या कारवायांची माहिती घेत त्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर विभागाने त्याच्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:34 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!