नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

11 वर्षाची मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत अत्याचार, पोलिसांनी “पॉक्सो” लावत मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी सातारा : महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबतच नाहीयेत. रोज अशा अनेक बातम्या मन सुन्न करून जातात. साताऱ्यातून एक अशीच मन सुन्न करणारी, आणि संताप वाढवणारी बातमी समोर आली आहे. साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आखत आहे. मात्र तरीही महिला अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहे. कित्येकदा नातेवाईकांकडूनच अत्याचार होण्याच्या अनेक घटना समोर येतात. साताऱ्यातही काहीसा असाच प्रकार घडलाय. नात्यातल्या एका तरुणानेच या अल्पवयीन मुलीचा घात केला. या अत्याचाराच्या घटनेने सातारा शहरासह महाराष्ट्रत खळबळ माजली आहे. या घटनेनंतर प्रशासनही आता अलर्ट मोडवर आलं आहे.

नेमका प्रकार काय घडला?

सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरात ही खळबळजनक घटना घडली आहे. 11वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्याच नात्यातील एका 22 वर्षीय युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर संबंधित युवक हा फरार झाला होता. मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी या युवकाचा तातडीने शोध घेतला आणि याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या तरुणाविरोधात अत्यंत कठोर पाऊलं उचलताना दिसून येत आहे. पोलिसांकडून या गुन्ह्यात वेगाने काम सुरू आहे. या घटनेने पोलीस प्रसासनाचीही झोप उडवली आहे.

पॉक्सोनुसार गुन्हा दाखल

हा अत्याचाराचा सर्व प्रकार पीडित युवतीने तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने हलवली. काही तासातच पोलिसांनी 22 वर्षीय युवकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी युवकाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. यातही आणखीही काही महत्वाच्या बाबी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:32 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!