DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- कैलास माळी
धुळे :- शिरपूर तालुका जामन्यापाड्यातील ग्रामसेवक चौधरीस चौदाशे रुपयाची लाच घेतांना धुळे ACB ने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांनी त्यांच्या आत्याचा जन्म दि. ०१/०५/१९६८ रोजी मौजे जामन्यापडा येथे झाला होता. परंतु त्यांचे आजोबा अशिक्षित होते म्हणून आत्याची जन्म नोंद केली गेली नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांनी मे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग ०१ यांच्या न्यायालयात जन्माची नोंद करण्याकरिता फौजदारी किरकोळ अर्ज नंबर 472/ 2022 केला होता. त्या अर्जावर 14/ 10/ 2022 रोजी सुनावणी करून आदेश पारित केले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होण्याकरिता दिनांक ०२/ ०६ /२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय जामन्यापाडा येथे जाऊन माननीय न्यायालयाचे आदेशाची प्रत जोडून एक अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा केला होता. त्यावेळी ग्रामसेवक चौधरी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद करून दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चौदाशे रुपयाची लेट फी च्या नावाखाली लाचेची मागणी केली. त्या मागणी केल्याची तक्रार दूरध्वनीद्वारे धुळे लाच लुचपत विभाग कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरून धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रोजी दि.०५/०६/२०२३ रोजी जामन्यापाडा तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी पडताळणी केली असता ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या अत्याच्या जन्माची नोंद करून घेण्यासाठी लेट फी च्या नावाखाली पंच साक्षीदारा समक्ष १४०० रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाच ग्रामपंचायत कार्यालय जामन्यापाडा तालुका शिरपूर जि. धुळे येथे स्वीकारताना त्यांना धुळे Acb ने रंगेहात पकडले. त्यादरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेते वेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर व वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.