नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सराफावर हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे

कोल्हापूर :- सांगरुळ येथे सराफावर हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 51 ग्रॅम सोन्याचे दागिने, 119 ग्रॅम चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण 11 लाख 18 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तक्रारदार तेजाराम पेराजी माळी (वय 45, रा. शुक्रवार पेठ कोल्हापूर) यांचे सांगरूळ ता.करवीर येथे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 21 मार्च रोजी रात्री 9 च्या सुमारास दुकान बंद करून घरी जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान हा गुन्हा राजस्थान राज्यातील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रविण ओबाराम माळी व महिला आरोपी खुशबू जसराज परमार (दोघेही रा. जालोर, राजस्थान) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस केलेले दागिने वितळवून तयार केलेले सोन्याचे व चांदीचे लॉकेट, गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार व महिला पो.कॉ. प्रज्ञा पाटील यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:17 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!